भिगवण : येथील भारतीय जैन संघटनेच्या शाखेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त स्वामी समर्थ मंदिर परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी भारतीय जैन संघटनेचे पुणे विभागीय अध्यक्ष सचिन बोगावत, कमलेश गांधी, गिरीश मुनोत, किरण रायसोनी, प्रदीप बोरा, राहुल गुंदेचा, अतुल मुनोत, चेतन बोरा, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. अमोल खानावरे, माजी अध्यक्ष संजय खाडे व परिसरातील नागरिकांनी सहभाग घेतला. जागतिक तापमान वाढीसारख्या समस्या सध्या जाणवत आहे. त्यामुळे यावर एकमेव उपाय म्हणजे वृक्षारोपण आहे. त्यामुळे पावसाळ्यामध्ये सर्वांनी वृक्षारोपण करावे, असे आवाहन भारतीय जैन संघटनेच्या वतीने करण्यात आले.