बारामतीमध्ये आरपीआय मातंग आघाडी शाखांचे दिमाखात उद्घाटन

0
77

बारामतीमध्ये आरपीआय मातंग आघाडी शाखांचे दिमाखात उद्घाटन

बारामती (प्रतिनिधी) – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (मातंग आघाडी) शाखांचे उद्घाटन बारामतीत मोठ्या दिमाखात पार पडले. या कार्यक्रमाचे उद्घाटन मातंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब वायदंडे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी पुणे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत कदम साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाला गौरव प्राप्त झाला.

या कार्यक्रमास मातंग आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रदीप भाऊ कांबळे, राज्याचे उपाध्यक्ष सुनील भाऊ शिंदे, महाराष्ट्र संघटक सचिव दत्ताभाऊ चव्हाण, पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रमोद जी खंडाळे, उपाध्यक्ष सोमनाथ झोंबाडे, मातंग महिला आघाडीच्या अध्यक्ष सीमा घोरपडे, बारामती आरपीआय तालुकाध्यक्ष संजय जी वाघमारे, बारामती शहर युवक अध्यक्ष मयुरजी मोरे, मुळशी तालुक्याचे युवक कार्याध्यक्ष सागर जी कांबळे, मातंग आघाडीचे तालुकाध्यक्ष अशोक कुचेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच, सिद्धेश्वर लिंबोडी शाखेचे अध्यक्ष सोमनाथ लांडगे, पारवडी शाखेचे शहाजी लांडगे, दादा पाटील नगर तांदुळवाडी शाखेचे अध्यक्ष विठ्ठल पवार, बाबुर्डी शाखेचे अध्यक्ष रोहित जगताप, तालुक्याचे युवक अध्यक्ष वैभव जगताप यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

या उद्घाटन सोहळ्याद्वारे मातंग आघाडीने संघटन बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच समाजातील विविध प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here