बारामतीत श्री संत श्रेष्ठ श्री सेना महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

0
163

बारामती श्री संत श्रेष्ठ श्री सेना महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी तर विविध मान्यवरांचे सत्कार समारंभ संपन्न….!

बारामती प्रतिनिधी: बारामती येथील भाई कोतवाल हाउसिंग सोसायटी मध्ये मोठ्या उत्साहात दिनांक १७ सोमवार रोजी दुपारी १२ वाजता गुलाब पुष्प वाहून श्री.संतश्रेष्ठ श्री सेना महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली यावेळी भिगवण रोडच्या -भाई कोतवाल हाऊसिंग सोसायटी येथील संत सेना महाराज जयंती औचित्य साधून सर्व नाभिक बंधू भगिनींच्या लहान थोर मंडळींच्या उपस्थितीत श्री सेना महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात पूजापाठ, श्रीच्या आरती, तर आशिष रवींद्र सूर्यवंशी सौ. सूर्यवंशी यांच्या हस्ते श्री ची पूजापाठ तर श्रीच्या आरती करण्यात आले. भाई कोतवाल हाऊसिंग सोसायटीतील समाज बांधव, बारामती तालुका नाभिक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
यामध्ये विविध मान्यवराचे सत्कार समारंभ संपन्न झाले. बारामती तालुका नाभिक संघटनेचे अध्यक्ष सुधाकर माने भाई कोतवाल हाउसिंग सोसायटीचे चेअरमन व सचिव रवींद्र सूर्यवंशी सुनील माने यांचा सत्कार तर साप्ताहिक भावनगरीच संपादक संतोष शिंदे यांची इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन इंटरनॅशनल नवी दिल्ली संघटनेच्या महाराष्ट्र सचिव पदी निवड व चंद्रपूर येथे दि.५
मार्च रोजी महाराष्ट्र गौरव रत्न, राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज योद्धा पुरस्कार ने सन्मानित करण्यात आल्यब्दल त्यानिमित्त बारामती तालुका नाभिक संघटनेच्या वतीने व भाई कोतवाल हाउसिंग सोसायटीच्या वतीने वरील सर्व मान्यवरांचे सत्कार संपन्न झाले. यावेळी प्रमुख उपस्थिती बारामती तालुका नाभिक संघटनेचे अध्यक्ष सुधाकर माने, उपाध्यक्ष सुदाम कडणेसर, डॉ. प्रा. सुरेश साळुंखे, हेमंत जाधव, महेंद्र यादव, रवींद्र सूर्यवंशी, सुनील माने, गणेश चौधरी, किसनराव भाग्यवंत, किरण कर्वे, कुमार सूर्यवंशी, अमोल राऊत, आकाश काळे, महादेव साळुंखे, बापूराव साळुंखे, श्रीपाल राऊत, अँड . प्रकाश जाधव, सुनील जाधव तसेच सर्व नाभिक समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री संतश्रेष्ठ श्री सेना महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात पार पडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here