बारामतीत विद्या प्रतिष्ठान मध्ये  होणार आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचे सेंटर….

0
206

बारामतीत विद्या प्रतिष्ठान मध्ये  होणार आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचे सेंटर….

ज्येष्ठ नेते शरद पवार व सकाळ माध्यम समूहाचे प्रमुख प्रतापराव पवार यांच्या पुढाकारातून बारामतीत  भविष्यातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक अत्याधुनिक केंद्राची स्थापना करण्यात येणार असून या केंद्राच्या माध्यमातून विविध अभ्यासक्रमाची सुरुवात  मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभहस्ते २३ जानेवारी २०२३ रोजी विद्या प्रतिष्ठान संकुलात ठीक ११.०० वाजता संपन्न होणार आहे. विद्या प्रतिष्ठान संकुलामध्ये यासाठी ३५ कोटी रुपये खर्चून एक अत्याधुनिक इमारत तयार होणार आहे. यात विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित विविध अभ्यासक्रमांचे शिक्षण घेता येईल. डिझाईन टेक या कंपनीच्या सहकाऱ्यांनी विद्या प्रतिष्ठान व आंतरराष्ट्रीय ख्यातीची आयबीएम यांच्यामध्ये हा सामंजस्य करार झालेला आहे  या करारा अंतर्गत बारामती आणि बारामतीच्या  पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना आता कृत्रीम बुध्दीमत्तेचे (आर्टिफिशियल इंटेलिजेन्स) अत्याधुनिक शिक्षण बारामतीतच उपलब्ध होणार आहे. बदलत्या काळाची पावले ओळखून बारामती मध्ये विद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे रोजगाराभिमुख अभ्यासक्रम बारामतीतच शिकविले जाणार आहेत. जागतिक स्पर्धेत ग्रामीण भागातील युवक या निमित्ताने ताकदीने उतरु शकतील. 
ज्येष्ठ नेते शरद पवार यांची बारामती हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे एक भारतातील प्रमुख केंद्र म्हणून समोर यावे अशी इच्छा असून त्या दृष्टीने विद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे अभ्यासक्रम नव्याने चालविले जाणार आहे. बारामती मध्ये डेटा सायन्स, आयओटी (इंटरनेट ऑफ थिंग्स) ए. आर. यु. आर. (Augmented Reality & Virtual Reality) आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) व मशीन लर्निंग तसेच सायबर सिक्युरिटी या विषयांवर अभ्यासक्रम शिकविले जातील. या अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र प्राप्त केल्यानंतर जगातील महत्वाच्या कंपन्यांमध्ये त्वरित नोकरीची संधी विद्यार्थ्याना मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here