बारामतीत रविवारी भिमपुत्र आयडॉल सोहळा ठरला प्रचंड गाजलेला!
सुनेत्रा पवार आणि डॉ. नरेंद्र जाधव यांच्या उपस्थितीत १२ थोर व्यक्तिमत्त्वांचा गौरव
बारामती –
बारामतीकरांचा अभिमान ठरलेला, तरुणाईला प्रेरणा देणारा आणि संविधानवादी विचारांची ज्वालां पेटवणारा – असा थाटात बारामतीत रविवारी (२० एप्रिल) भिमपुत्र आयडॉल २०२५ पुरस्कार सोहळा पार पडला. संविधान विचारमंचाच्या वतीने आयोजित या भव्य कार्यक्रमाने गदिमा सभागृह अक्षरशः गगनभेदी टाळ्यांनी दणाणून गेले!
या सोहळ्याला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुविद्य पत्नी व लोकसभा तालिका अध्यक्ष खासदार सौ. सुनेत्रा पवार आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु व ख्यातनाम संविधान अभ्यासक डॉ. नरेंद्र जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

रंगला भीमपुत्रांचा सन्मान!
या सोहळ्यात आपल्या कर्तृत्वाने समाजात दीपस्तंभ ठरलेल्या देशभरातील १२ मान्यवरांना भिमपुत्र आयडॉल २०२५ सन्मान देण्यात आला. प्रत्येकाच्या नावावर टाळ्यांचा कडकडाट, सभागृहात ऊर्जा ओसंडून वाहत होती.

पुरस्कार विजेते:
- कल्पना सरोज – मुंबई
- देवांश धनगर – आग्रा
- डॉ. मुरहरी केळे – ठाणे
- डॉ. स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील – अकलूज
- राजेश चंद्रा – लखनौ
- शेख चांद पाशा – हैद्राबाद
- सुमन धामणे,
8)सीए शंकर अंदानी – अहिल्यानगर
9) हनुमंत उर्फ बाबुराव केंद्रे – नागदरवाडी (ता. लोहा, जि. नांदेड)
10). डॉ. रोहन अकोलकर – बारामती
11). मारुती बनसोडे – नळदुर्ग (धाराशिव)
12). पांडुरंग सोनावणे – जेजुरी
या सर्वांना खासदार सुनेत्रा पवार यांच्या हस्ते गौरवचिन्ह, मानपत्र व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.
सुनेत्रा पवार यांची दिलखुलास भाषणे:
“बारामतीत सर्व काही आहे! पण आजचा सोहळा म्हणजे सामाजिक जाणिवेचं अप्रतिम उदाहरण आहे. जे समाजासाठी जपतात, त्यांचं कौतुक व्हायलाच हवं! अजितदादा पवार यांच्या वतीने या कार्यकर्त्यांचे पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे मन:पूर्वक अभिनंदन!” – अशा शब्दांत त्यांनी मान्यवरांचा गौरव करताना, आपल्या खास शैलीत प्रेमाचा वर्षाव केला.
डॉ. नरेंद्र जाधव यांची प्रबोधनपर प्रेरणा:
“संविधान फक्त पुस्तकात नाही, तर आपल्या आचरणात असलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घराघरात पोहोचले पाहिजेत.” असा ठाम संदेश देत त्यांनी उपस्थितांना संविधान समजून घेण्याची प्रेरणा दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संविधान विचारमंच अध्यक्ष राजेश कांबळे यांनी केले त्यांनी आपल्या भीम पुत्र आयडॉल 2025 आयोजन व त्यामागचे कारण स्पष्ट सांगितले व इथून पुढे या कार्यक्रमाचे आयोजन होत राहील असेही प्रस्ताविकात म्हटले. कार्यक्रमाचे
सुत्रसंचालन अनिल सावळे पाटील, यांनी केले .तर सर्वांचे मनापासून आभार मानणारे श्री. घनश्याम केळकर यांनी कार्यक्रमात रंगत आणली.यावेळी
मोहन गायकवाड समन्वयक, डॉ प्रा. D.V.सरवदे सर,सूर्यकांत मोरे, श्रीनिवास शेलार, रुपाली गायकवाड, सागर भोसले, शिंदे राजकिरण,सत्यवान जगताप राणी जाधव व संविधान विचारमंचचे सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रचंड मेहनत घेतली.
बारामतीकरांचा मोठा जनसागर या वेळी हजेरी लावून कार्यक्रमाचे औचित्य अजूनच वाढवून गेला.
एकंदरीत, भीमपुत्र आयडॉल २०२५ हा कार्यक्रम केवळ एक सोहळा नव्हे, तर सामाजिक प्रबोधन, प्रेरणा, आणि कृतज्ञतेचा जिवंत जाहीरनामा ठरला!
बारामतीच्या भूमीतून उठलेला हा आवाज आता संपूर्ण महाराष्ट्रात घुमणार हे निश्चित!
