बारामतीत दि.९ रोजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्य प्रकरण निषेध मोर्चा….!

0
179

बारामती:-प्रतिनिधी: संभाजी भिडे मूळचे (मनोहर कुलकर्णी) यांच्या विदर्भ दौऱ्यामध्ये अमरावती येथे त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व महात्मा जोतिबा फुले यांच्या बाबत खूप खालच्या थराचे वाईट वाईट शब्दात वादग्रस्त वक्त्याव्य केले आहेत.

राष्ट्रपिता महात्मा गांधी ,व महात्मा जोतिबा फुले बद्दल समाजामध्ये द्वेष निर्माण व्हावा म्हणून विधान केले असून त्यांची तांबोडतोब चौकशी करून अटक करावी. याच्या निषेधार्थ बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक संघटना व बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटना, बारामती.याच्या वतीने निषेध सभा व मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

या निषेध सभा व निषेध मोर्चास काँग्रेस पक्ष , वंचित बहुजन आघाडी , संभाजी बिग्रेड , बौध्द युवव संघटना , आर पी आय (ए – गट) , डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समिती बारामती , बारामती तालुका अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद , श्री.संत सावतामाळी संघ,बारामती तालुका,सावता परिषद बारामती . , यांनी एकमतांनी पाठिंबा दिलेला आहे.
निषेध मोर्चा सकाळी ११ वाजता सुरू होईल काँग्रेस कमिटी गुणवडी चौक, गांधी चौक , सुभाष चौक , हुतात्मा स्तंभ ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी चौक ते प्रशासकीय भवन निषेध मोर्चा असा असेल.
निषेध सभा व क्रांतिदिन वार बुधवार दिनांक ०९ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी १२ वाजता हुतात्मा स्तंभ , वंदे मातरम चौक , (भिगवण चौक) येथे आयोजित केली आहे.
तरी सदर निषेध सभा व निषेध मोर्चामध्ये बारामती मधील नागरिकांनी , व्यापारी , डॉक्टर , वकील , सर्व राजकीय पक्षांनी , सर्व संघटनेंनी , महात्मा गांधी व महात्मा जोतिबा फुले विचारसरणीच्या सर्व जनतेनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन

निलेशभाई कोठारी बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक संघटना व बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटना, बारामती यांच्यावतीने करण्यात आलेले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here