बारामतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाची जय्यत तयारी, सर्वत्र उत्साहाचे वातावरण

0
66

बारामतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाची जय्यत तयारी, सर्वत्र उत्साहाचे वातावरण

बारामती | १४ एप्रिल

परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिल रोजी साजरी होणारी जयंती यंदाही बारामतीत मोठ्या जल्लोषात व उत्साहात साजरी होणार आहे. सध्या संपूर्ण शहरात या महामानवाच्या जयंतीनिमित्त जय्यत तयारी सुरू असून, ठिकठिकाणी बॅनर्स, कटआउट्स, सजावट यामुळे वातावरण भारावून गेले आहे.

बारामतीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसराचे देखील सुशोभीकरण करण्यात येत आहे. या सप्ताहात शहरात भव्य मिरवणुक, अन्नदान कार्यक्रम, बौद्धिक चर्चा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन विविध संघटना, मंडळे , सोशलक्लब च्या वतीने करण्यात आले आहे.

शहरातील कार्यकर्ते, सामाजिक संस्था व डॉ. आंबेडकरप्रेमी नागरिक एकत्र येऊन हा दिवस अधिक प्रभावी व प्रेरणादायी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. “या वर्षीचा उत्सव अधिक भव्य आणि प्रेरणादायी ठरणार आहे,” असे भावनगरीशी बोलताना सांगितले.

डॉ. आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने बारामतीत भीममय उत्सवाचे रंग उधळले जात असून, सर्वत्र जय भीमचा गजर आणि सामाजिक ऐक्याचा संदेश अनुभवायला मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here