बारामतीत जनआक्रोश! स्व. संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाचा प्रचंड एल्गार
बारामती : स्व. संतोष देशमुख यांच्या निघृण हत्येच्या निषेधार्थ आणि दोषींवर तात्काळ कठोर कारवाईच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज, आयोजीत 9 मार्च 2025 रोजी कसबा बारामती येथील शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करून मोर्चात ,सर्व जाती-धर्मांतील हजारो लोकांनी एकजुटीने सहभाग घेतला. संतप्त जमावाने स्व .संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तातडीने फाशीची शिक्षा द्यावी, अशी जोरदार मागणी …

आज बारामती बंद, तर जनतेत देशमुख कुटुंबिया प्रति कनवळा तर स्वर्गीय देशमुख यांच्या मारेकऱ्याना फाशीची शिक्षा व्हावी करिता आक्रोश मोर्चातून ऐकू आला…!
बारामती बंदला जोरदार प्रतिसाद मिळाला .मात्र, या क्रूर हत्येच्या निषेधार्थ आज बारामतीतील मोठ्या प्रमाणात आवाज जनसागर रस्त्यावर उतरला.

देशमुख कुटुंबीयांचा आक्रोश – “आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे!”
या मोर्चात स्व. संतोष देशमुख यांचे कुटुंबीय सहभागी झाले होते. त्यांची लाडकी लेक व्यथित मनाने बोलत असताना प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.
“माझ्या वडिलांच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर फाशीची शिक्षा झालीच पाहिजे!”

स्व. संतोष देशमुख यांच्या भावाने मोर्चातील उपस्थित त्यांना सांगितले की
“महाराष्ट्र सरकार आणि प्रशासनाने तपास स्पष्ट करीत दोषींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा झालीच पाहिजे!”बीडचे प्रशासकीय व्यवस्थापन व राजकारण, राजकीय वरदहस्त याविषयी पोटतिडकीचे भाष्य केले.
मोर्चाच्या समारोपाला, बारामतीचे प्रांत अधिकारी नावडकर यांना निवेदन देण्यात आले.

मराठा क्रांती मोर्चाच्या सहभागी देशमुख कुटुंबीयांनी
“हा लढा फक्त संतोष देशमुखांसाठी नाही, तर भविष्यात अशा गुंडशाही लोकांना पाठीशी घालणाऱ्या त्या नराधमाना आदल घडवण्यासाठी न्यायासाठी आहे! पुन्हा असे कृत्य होणार नाही याकडे सरकारने लक्ष देण्याची अशा व्यक्त केली.

बारामतीत ‘क्रांती’चा एल्गार –
हा मोर्चा सामाजिक एकजुटीचे अद्वितीय उदाहरण ठरला.
