बारामतीच्या तुषार भगत यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड..!

0
100
Oplus_131104

बारामतीच्या तुषार भगत यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड

बारामती प्रतिनिधी: बारामती तालुक्यातील भगतवाडी येथील तुषार अशोक भगत यांनी आपल्या जिद्द, मेहनत आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदाला गवसणी घातली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) स्पर्धा परीक्षेत यश मिळवत त्यांनी कुटुंबाचे आणि गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.

तुषार भगत हे एका शेतकरी कुटुंबातील असून, त्यांनी बारामतीतील मराठा सेवा संघाच्या राजमाता जिजाऊ करिअर सेंटर येथे मार्गदर्शन घेतले. या केंद्राने त्यांना अभ्यासासाठी आवश्यक सर्व सुविधा पुरवल्या तसेच राजमाता जिजाऊ शिष्यवृत्तीच्या माध्यमातून आर्थिक मदत देखील मिळाली. त्यांच्या यशाने या करिअर सेंटरमधील इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली आहे.

तुषार भगत यांच्या या यशाबद्दल मराठा सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांच्या पुढील कारकिर्दीला शुभेच्छा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here