बारामतीकरांची एकमुखी अपेक्षा — विकासाभिमुख, अभ्यासू आणि गोरगरिबांचा कैवारी’ सर्वसामान्यांच्या बाजूने असलेला नगराध्यक्ष हवा!

0
83
Oplus_132128

बारामतीकरांची एकमुखी अपेक्षा — विकासाभिमुख, अभ्यासू आणि गोरगरिबांचा कैवारी’ सर्वसामान्यांच्या बाजूने असलेला नगराध्यक्ष हवा!

बारामती, दि. — आगामी बारामती नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात सध्या सर्वाधिक चर्चिला जाणारा विषय म्हणजे — “बारामतीचा भावी नगराध्यक्ष व नगरसेवक कसा असावा?”
शहराच्या प्रत्येक गल्लीबोळातून उमटणाऱ्या जनभावनांनुसार, विकासाचे दूरदृष्टी असलेला, प्रामाणिक, अभ्यासू आणि सर्वसामान्यांच्या अडचणी गोरगरीब जनतेचे प्रश्न समजून घेणारा नेता या पदासाठी सर्वाधिक योग्य ठरेल, असा सर्वसामान्यांचा एकमुखी सूर आहे.

बारामतीकर आता केवळ आश्वासनांवर विश्वास ठेवत नाहीत, तर काम करणाऱ्या, विकास साधणाऱ्या आणि शहराचा चेहरा बदलणाऱ्या नेतृत्वाच्या शोधात आहेत. उद्योग, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, जलव्यवस्थापन आणि स्वच्छता या सर्व क्षेत्रांमध्ये सातत्याने प्रगती साधणारी बारामती — आता नव्या उंचीवर नेणारा दूरदृष्टी संपन्न नगराध्यक्ष शोधत आहे.

स्थानिक नागरिकांच्या चर्चेतून स्पष्ट होतं की, बारामतीला असा नगराध्यक्ष हवा —

जो नव्या प्रकल्पांची कल्पना करून ते प्रत्यक्षात उतरवेल,

शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, वाहतूक व्यवस्था जनतेच्या प्रश्नाबरोबर व्यापाऱ्यांचे प्रश्न विविध संघटनांचे प्रश्न बारामतीतील जनतेचा अभ्यास असणारा अभ्यासू यासारख्या मूलभूत सेवांमध्ये सुधारणा करेल,

नवीन गुंतवणूकदार आणि उद्योग शहरात आणेल,

आणि तरुणाईला रोजगाराच्या संधी निर्माण करून देईल.

याचबरोबर नागरिकांना असा नगरसेवक हवा —

जो आपल्या प्रभागाच्या विकास आराखड्याबाबत स्पष्ट दृष्टी ठेवतो,

नगरपरिषदेच्या बैठकीत जनतेचा आवाज ठामपणे मांडतो,

शहराच्या स्वच्छतेपासून ते स्मार्ट प्रकल्पांपर्यंत सातत्याने पाठपुरावा करतो,

आणि शहराच्या प्रगतीत सक्रिय भूमिका बजावतो.

अनेक बारामतीकरांचे म्हणणे आहे की,

“बारामती आज शिक्षण, शेती आणि उद्योग यांच्या संगमावर उभी आहे. आता शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तितकाच जाणकार, जिद्दी आणि दूरदृष्टी असलेला नगराध्यक्ष हवा. जो केवळ सत्ता सांभाळणार नाही, तर शहराच्या भविष्यासाठी दिशा ठरवेल.”

मागील काही वर्षांत नगरपरिषदेत कार्यरत राहिलेले अनेक नगरसेवक व नगराध्यक्षांनी चांगले काम केले असले तरी, आता बारामतीला युवकवर्गाला प्रेरणा देणारे, सर्व घटकांना एकत्र घेऊन विकासाचा नवा अध्याय लिहिणारे नेतृत्व अपेक्षित आहे. बारामतीकरांच्या मनात असाही प्रश्न उद्भवतो की शिवाय विरोधक हवेत विकासात्मक दृष्टिकोनासाठी एक हाती सत्ता नको सत्ताधाऱ्याला चाप असावा…!

बारामतीतील या उत्साही चर्चेमुळे आगामी निवडणुकीची रंगत अधिकच वाढली आहे. शहराचा विकास, नव्या संकल्पना आणि सर्वांगीण प्रगती या मुद्द्यांवर कोण उमेदवार जनतेच्या मनात स्थान मिळवतो आणि “विकासाच्या वाटेवरील बारामतीचा नगराध्यक्ष” ठरतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Previous articleसंविधान रडतंय…
Next articleबारामती–माळेगाव : दादांच्या ‘चेकमेट’ स्ट्रॅटेजीनं राजकीय वातावरण तापलं…
Bhavnagari
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here