बारामती सहकारी बँकेचा सन 2022-23 सालचा लाभांश जाहीर….

बारामती सहकारी बँकेचा सन 2022-23 सालचा लाभांश जाहीर….

0
76

बारामती सहकारी बँकेचा सन 2022-23 सालचा लाभांश जाहीर….

दि बारामती सहकारी बँक ही पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य व नावाजलेली नागरी सहकारी बँक असून बँकेचा एकूण व्यवसाय 3500 कोटींवर गेलेला आहे. बँकेच्या दि. 31 मार्च 2023 अखेरच्या आर्थिक प्रगतीनुसार रिझर्व बँकेने सभासदांना त्यांच्या भागावर शेकडा 5 टक्के दराने लाभांश जाहीर करण्यास परवानगी दिली आहे. बँकेने राबविलेल्या विशेष वसुली अभियानामुळे बँकेची सांपत्तिक स्थिती उत्तम झालेली असून बँकेचे भांडवल पर्याप्तेचे प्रमाण शेकडा 13.50 टक्के इतके झालेले आहे. या गत आर्थिक वर्षाअखेर बँकेस रू. 5.21 कोटी इतका निव्वळ नफा सर्व तरतुदी व आयकराची तरतुद करून झालेला आहे.

दि. 31 मार्च 2023 अखेर बँकेच्या ठेवी रू. 2222.10 कोटी व कर्जवाटप रू. 1406.32 कोटी इतके झालेले असून बँकेची गुंतवणूक रू. 835.17 कोटी वर पोहोचलेली आहे.

बँकेस मिळालेल्या यशाबद्दल सभासद व खातेदारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे. बँक आगामी काळातही विक्रमी नफा कमावून सभासदांना भागावर आणखी जादा लाभांश पुढील आर्थिक वर्षासाठी जाहीर करेल असा विश्वास बँकेचे अध्यक्ष सचिन सदाशिवराव सातव यांनी या प्रसंगी बोलताना जाहीर केला.

बँकेच्या आजपर्यंच्या विकासामध्ये सभासदांचा बँकेवरील अढळ विश्वास, खातेदारांचे बँकेबरोबरचे अतूट नाते व ग्राहकांचा संतोष याचेच पाठबळ लाभलेले आहे.

बँकेच्या वाटचालीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व सौ. सुनेत्रा पवार, अध्यक्षा बारामती हायटेक टेक्सटाईल पार्क यांचे सततचे मार्गदर्शन व सहकार्य यामुळेच बँकेचा उत्तरोत्तर विकास होत असल्याचे अध्यक्षांनी यावेळी आवर्जुन नमूद केले.

बँकेचे प्रगतीत बँकेचे उपाध्यक्ष किशोर शंकर मेहता तसेच सर्व सहकारी संचालक अॅड. शिरीष दत्तात्रय कुलकर्णी, देवेंद्र रामचंद्र शिर्के, उध्छ्व सोपानराव गावडे, विजयराव प्रभाकरराव गालिंदे, नामदेवराव निवृत्ती तुपे, मंदार श्रीकांत सिकची, डॉ. सौरभ राजेंद्र मुथा, जयंत विनायकराव किकले, रणजित वसंतराव धुमाळ, रोहित वसंतराव घनवट, सौ. नुपूर आदेशकुमार शहा (वडूजकर), वंदना उमेश पोतेकर, सौ. कल्पना प्रदिप शिंदे व तज्ञ संचालक प्रितम सुर्यकांत पहाडे (सी.ए.) तसेच व्यवस्थापन समितीचे सदस्य शांताराम चिमाजी भालेराव, अमोल चंद्रभान गोजे व रमेश भगवानराव गानबोटे, मुख्यालयीन अधिकारी वर्ग, सर्व शाखाधिकारी, वसुली अधिकारी व बँकेचा सर्व सेवकवर्ग तसेच हितचिंतक यांनी घेतलेल्या परिश्रमाबदद्ल अध्यक्षांनी सर्वांचे मनपुर्वक आभार व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here