बारामती रेशीम मार्केट मध्ये कोषास प्रति किलोस रू. ७७०/- उच्चांकी दर….

0
14

बारामती रेशीम मार्केट मध्ये कोषास प्रति किलोस रू. ७७०/- उच्चांकी दर

बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे रेशीम कोष मार्केट मध्ये दि. ३० जानेवारी २०२५ रोजी कोषास प्रति किलोस रू. ७७०/- असा उच्चांकी दर मिळाला. सदर दिवशी ४४५ किलो आवक होऊन किमान रू. ४५०/- आणि सरासरी रू. ७२०/- प्रति किलो दर निघाले. श्री.चंद्रकांत दत्तु गुळुमकर रा. साबळेवाडी ता. बारामती यांचे कोषास प्रति किलोस रू. ७७०/-इतका उचांकी दर मिळाला तर एकुण रू. १ लाख ७८ हजार रक्कम मिळाली. रेशीम कोष उत्पादक शेतक-यांनी आपला कोष विक्रीस आणताना ग्रेडींग व स्वच्छ करून आणावा म्हणजे कोषास जादा दर मिळेल. तसेच शेतक-यांनी परस्पर बाहेरील व्यापा-यांना कोष विक्री करू नये. आपला कोष रेशीम कोष मार्केट मध्येच विक्री करावा. बारामती रेशीम कोष मार्केट मध्ये ई-नाम प्रणाली सुरू असल्याने चांगली विक्री व्यवस्था उपलब्ध आहे.

त्यामुळे इतर व बाहेरील राज्यातील मार्केट प्रमाणे दर मिळत आहेत. बारामती बाजार समिती तर्फे शेतकरी व रिलर्स यांना संबंधित आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देणेत येतील असे आवाहन बाजार समितीचे सभापती श्री. विश्वास आटोळे व उपसभापती श्री.रामचंद्र खलाटे यांनी केले आहे.
बारामती मार्केट कमिटी मध्ये रेशीम कोष खरेदी विक्री ई- नाम प्रणाली द्वारे सुरू असुन डिंसेबर २०२४ व जानेवारी २०२५ या दोनच महिन्यात ३०७ शेतक-यांचा २६ टन कोषाची विक्री झाली असुन दीड कोटीची उलाढाल झाली आहे. कोषास रू. ५९०/- पासुन ७७०/- प्रति किलोस दर मिळाला आहे. त्यामुळे शेतक-यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. पुणे जिह्वा व परिसरात तुती लागवड दिवसेंदिवस वाढत आहे. बारामती रेशीम मार्केट मध्ये ऑनलाईन लिलाव व पारदर्शक व्यवहार, अचुक वजन यामुळे शेतकरी कोष घेऊन येत आहेत. अशी माहिती सचिव श्री.अरविंद जगताप यांनी दिली.
शासना मार्फत बारामती मुख्य यार्ड मध्ये रेशीम कोष मार्केट व कोषोत्तर प्रक्रिया, प्रशिक्षण केंद्र इमारतीचे बांधकाम सुरू असुन त्याठिकाणी शेतकरी व व्यापा-यांना सर्व सुविधा उपलब्ध होणार असल्याने भविष्यात रेशीम कोष उत्पादक व रिलर्स करिता एक भव्य मार्केट होणार आहे अशी माहिती रेशीम संचालनालय, नागपुरचे उपसंचालक डॉ.महेंद्र ढवळे यांनी दिली. सदर इमारतीची संपुर्ण पाहणी करून उपस्थित शेतक-यांना होणा-या सुविधांची माहिती दिली. उपस्थित रेशीम उत्पादक शेतक-यांचा व चौकी सेंटर चालकाचा सत्कार करून त्यांच्या समस्या व अडचणी समजावुन घेतल्या व त्या सोडवणे बाबत प्रयत्नशील राहु असे आश्वासन दिले. यावेळी डॉ. कविता देशपांडे, सहाय्यक संचालक, प्रादेशिक रेशीम कार्यालय,पुणे व श्री.संजय फुले, जिल्हा रेशीम विकास अधिकारी, पुणे व श्री.संदीप आगवणे,जिल्हा रेशीम विकास अधिकारी अहिल्यानगर तसेच बारामती बाजार समितीचे श्री.सुर्यकांत मोरे, सोमनाथ जगताप उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here