बारामती येथे श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ पादुका पालखीचे मंगळवार दि. 20 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 5 वाजतां आगमन व स्वागत बारामती शहरात होणार आहे

बारामती येथे श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ पादुका पालखीचे मंगळवार दि. 20 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 5 वाजतां आगमन व स्वागत बारामती शहरात होणार आहे

0
162

बारामती ः दि.18 श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट अक्कलकोट यांच्यावतीने महाराष्ट्र पादुका परिक्रमा अंतर्गत महाराष्ट्रात अनेक गावांमध्ये श्री स्वामी समर्थांच्या पादुकांच्या पालखीचे आयोजन करण्यात येत असते. त्यानुसार बारामती येथे श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ पादुका पालखीचे मंगळवार दि. 20 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 5 वाजतां आगमन व स्वागत बारामती शहरात होणार आहे.
सद‍्गुरू श्री स्वामी समर्थ पादुका पालखी उत्सव समिती यांच्या वतीने अक्‍कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका पालखी उत्सवाचे आयोजन मंगळवार दि. 20 फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. सायंकाळी 5 वां. पालखाचे आगमन बारामती शहरात होणार आहे. पालखीचा मुक्‍काम इंदापूर रोड येथील रयत भवन मार्केट यार्ड येथे होणार आहे. सायंकाळी 7 ते 7.30 वाजता महाआरती व नामस्मरणाचा कार्यक्रम, सं. महाआरती नंतर सर्व भाविक भक्‍तांना महाप्रसादाचे आयोजन रात्री 11 वाजेपर्यंत करण्यात आले आहे. रात्री 8 वाजतां श्री स्वामी भक्ती गीतांचा संगीतमय कार्यक्रम प्रसिध्द गायक श्री अरविंद देशपांडे, माळेगांव, बारामती प्रस्तुत करणार आहेत. दुसर्‍या दिवशी बुधवार दि. 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 ते 7 वां. श्री स्वामी समर्थ पादुकांना महाअभिषेक व दर्शन सोहळा होणार आहे. ज्या भाविकांना अभिषेक मध्ये सहभाग घ्यायचा असेल त्यांनी येताना दूध घेऊन यावे असे आवाहन आयोजक श्री स्वामी समर्थ पालखी उत्सव समिती, महावीर पथ, बारामती यांच्या वतीने श्री राजाभाऊ काका थोरात यांनी केले आहे. सकाळी 11 वाजता श्री स्वामी समर्थ पादुका पालखी पुढील गावी रवाना होणार आहे.


तरी सर्व बारामती मधील भक्‍तांनी श्री अक्‍कलकोट स्वामी समर्थ पादुका दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आयोजकांकडून कळविण्यात आले आहे.
कार्यक्रमाविषयी संपर्क.-
श्री राजाभाऊ थोरात(काका) मो.9860931637

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here