बारामती येथील कारभारी जिमखाना क्रिकेट संघाचा आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक

0
199

बारामती येथील कारभारी जिमखाना क्रिकेट संघाचा आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक

    बारामती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडीयम येथे दिनंाक 16 ते 22 फेब्रुवारी 2023 दरम्यान पार पडलेल्या आंतरजिल्हा 14 व 16 वर्षाखालील मिश्र क्रिकेट स्पर्धेमध्ये कारभारी जिमखाना क्रिकेट संघाने प्रथम क्रमांक पटकावला.
    कारभारी जिमखाना क्रिकेट संघाचा प्रथम सामना बारामती येथील सारा क्रिकेट अॅकॅडमी बरोबर खेळला गेला त्यामध्ये कारभारी जिमखाना संघाने 244 धावांचे आवाहन सारा क्रिकेट अॅकॅडमी समोर ठेवले परंतु साईराज शेलार व आर्य कुमावत यांच्या भेदक गोलंदाजीमुळे सारा क्रिकेट अॅकॅडमीचा संघ फक्त 59 धावात गारद झाला. 
    त्यानंतर कारभारी जिमखाना क्रिकेट संघाचा दुसरा सामना आर.एन. भिगवण क्रिकेट संघाबरोबर पार पडला त्यामध्ये आर्य कुमावत व पार्थ शिंदे यांच्या गोलंदाजीसमोर आर.एन. भिगवण क्रिकेट संघ 38 धावांमध्ये बाद झाला सदरील सामना हा कारभारी जिमखाना संघाने फक्त 3 षटकांमध्ये जिंकला.
    कारभारी जिमखाना क्रिकेट संघाचा तिसरा सामना सावळ ग्राम क्रिकेट संघाबरोबर पार पडला त्यामध्ये शिवलिंग व्यवहारे याने केलेल्या 85 धावांच्या जोरावर कारभारी जिमखाना संघाने 20 षटकांमध्ये 154 धावा केल्या. त्यास प्रतिउत्तर देताना सावळग्राम संघाला फक्त 100 धावा करता आल्या. हा सामना जिंकून कारभारी जिमखाना संघाने अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केला. 
    अंतिम सामना हा कारभारी  जिमखाना क्रिकेट संघ व डि.जे. क्रिकेट अॅकॅडमी यांच्यामध्ये झाला. त्यामध्ये साईराज शेलार (4-21-4), विश्वजित जगताप (3-8-1),  पार्थ शिंदे (5-13-1) यांच्या भेदक गोलंदाजी समोर डि.जे. क्रिकेट अॅकॅडमी संघास फक्त 87 धावा उभ्या करता आल्या. प्रतिउत्तरादाखल सार्थक ढमढेरेच्या (42 धावा) तडाखेबंद फलंदाजीमुळे केवळ सदरचा सामना कारभारी जिमखाना संघाने एकहाती केवळ 13 षटकांमध्ये जिंकत आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेच्या करंडकावर आपले नांव कोरले. 
    कारभारी जिमखाना क्रिकेट संघाला श्री. सचिन माने, श्री. इम्रान पठाण यांचे प्रशिक्षण व श्री. नितीन सामल, श्री. विनोद यादव, श्री. संजय हाडके, श्री. प्रशांत (नाना) सातव यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य नेहमीच लाभत असल्यामुळे व संघ वेळोवेळी विजयी वाटचाल करीत असल्यामुळे कारभारी आण्णा चॅरिटेबल फाऊंडेशन चे अध्यक्ष व विश्वस्तांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. 
 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here