बारामती बाजार समिती मध्ये मकेची २१ हजार पोत्याची उच्चांकी आवक

0
32

बारामती बाजार समिती मध्ये मकेची २१ हजार पोत्याची उच्चांकी आवक

बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे मुख्य बाजार आवारात चालु आठवडयात मकेची २१ हजार पोत्यांची उच्चांकी अशी आवक होऊन मकेला कमाल रू. २३५१ तर सरासरी रू. २१७५ प्रति क्विंटल दर मिळाला. शेतमालाचे लिलावापुर्वी इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यावर अचुक वजन, त्याच दिवशी पट्टी व योग्य बाजारभाव यामुळे शेतमालाची आवक मोठ्या प्रमाणात बारामती बाजार आवारात होत आहे. यावर्षी पाऊस समाधानकारक झाला असल्याने मकेची लागवड मोठ्या प्रमाणात झाली असल्याने बारामतीसह आसपासच्या तालुक्यातुन मकेची आवक होत  असल्याची माहिती समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी दिली. मुख्य आवारात आडतदार म्हणुन वैभव शिंदे, बाळासो फराटे, शिवाजी फाळके, प्रशांत शहा, अशोक सालपे, सचिव सातव,संतोष मासाळ, दिपक मचाले यांचे आडतीवर मोठ्या प्रमाणात मकेची आवक झाली असुन सतिश गावडे, अशोक भळगट, दिपक मचाले, मोरे  हे खरेदीदार आहेत. 

बारामती बाजार आवारात मके बरोबर इतर भुसार मालाची आवक होत असुन त्यामध्ये प्रामुख्याने बाजरी,गहु,ज्वारी, खपली, हरभरा, उडीद, मुग इत्यादी शेतमाल विक्रीसाठी येत आहेत.

आवारात बाजरीची ११६८ नगाची आवक होऊन बाजरीस कमाल रू. ३४०० तर किमान रू. २८०० प्रति क्विंटल दर मिळाला तर उडीदाला कमाल रू. ८०००, गव्हाला कमाल रू. ३४०१ तर किमान रू. २९०० आणि ज्वारीला कमाल रू. ३८०१ व सरासरी रू. २९००, हरभ-याचे कमाल रू. ६४२० प्रति क्विंटल दर निघाले. बाजार आवारात शेतमालाला चांगला दर मिळत असल्याने शेतक-यांनी आपला शेतमाल बारामती बाजार समिती मध्ये विक्रीस आणावा असे आवाहन समिती तर्फे करणेत येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here