बारामती एमआयडीसीत ट्रकच्या बॅटरी चोरीची घटना

0
2

पोलिसांकडून मुद्देमालासह आरोपी अटकेत

बारामती दि.०५

  बारामती एमआयडीसी परिसरातील कल्याणी ट्रान्समिशन टेक्नॉलॉजी कंपनीसमोर उभ्या असलेल्या ट्रकची बॅटरी चोरून लंपास चोरट्याला बारामती तालुका पोलिसांनी गजाआड केले आहे. पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा उलगडा झाला.
  ट्रान्सपोर्ट व्यवसाय करणारे जनार्धन रघुनाथ रांधवन (वय-३१) यांचा (एम.एच.१४ डी.एम ९१८१) क्रमांकाचा टाटा ११०९ ट्रक हा (दि.२५ रोजी) सकाळी कल्याणी कंपनीसमोर पार्क केला होता. दुसऱ्या दिवशी (दि.२६ रोजी) सकाळी ते ट्रककडे गेले असता ट्रक सुरू होत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी खाली उतरून पाहणी केली असता बॅटरीची वायरी तुटलेल्या अवस्थेत व बॅटरी गायब असल्याचे आढळले.

त्यांनी तत्काळ परिसरात शोध घेतला, मात्र बॅटरीचा काहीच मागमूस न मिळाल्याने त्यांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. चोरी गेलेली बॅटरी सुमारे दहा हजार रुपये किमतीची आहे. तक्रार नोंदताच पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवले. सीसीटीव्ही फूटेज, परिसरातील हालचाली आणि मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी संशयित शिवम प्रेमप्रकाश यादव (रा. घाडगे वस्ती, एमआयडीसी बारामती) यास ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने ट्रकची बॅटरी चोरीची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीकडून चोरीस गेलेली बॅटरी हस्तगत केली असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. आरोपीस तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल अपर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस अंमलदार सुरेंद्र वाघ अमोल पवार भारत खारतोडे यांनी केली आहे.

Previous articleबारामतीत – आंतर–महाविद्यालयीन ‘आविष्कार–२०२५’ संशोधन स्पर्धेला ५ व ६ डिसेंबरला उत्साहपूर्ण सुरुवात
Bhavnagari
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here