बारामती एमआयडीसी मध्ये लवकरच भव्य औद्योगिक प्रदर्शन आयोजित करणार – धनंजय जामदार

0
125

बारामती एमआयडीसी मध्ये लवकरच भव्य औद्योगिक प्रदर्शन आयोजित करणार – धनंजय जामदार

बारामती एमआयडीसी व परिसरात गेल्या काही वर्षात चांगली औद्योगिक प्रगती झालेली असून नवीन लहान मोठ्या उद्योगांची सातत्याने भर पडत आहे. या उद्योगांची व त्यांच्या उत्पादनांची ओळख राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर व्हावी व त्यातून त्यांना नवीन बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनच्या माध्यमातून लवकरच एक औद्योगिक प्रदर्शन आयोजित करण्यात येणार असलेची माहिती असोसिएशनचे अधक्ष धनंजय जामदार यांनी दिली. सातारा येथील मास औद्योगिक संघटनेने आयोजित केलेल्या औद्योगिक प्रदर्शनास धनंजय जामदार यांच्यासह उपाध्यक्ष मनोहर गावडे, संचालक महादेव गायकवाड, विष्णू दाभाडे, हरिश खाडे, रावसाहेब पाटील या शिष्टमंडळाने भेट दिली त्याप्रसंगी मास पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला त्यावेळी धनंजय जामदार बोलत होते.

धनंजय जामदार पुढे म्हणाले आजपर्यंत राज्यातील केवळ जिल्हा पातळीवर तुरळक ठिकाणी औद्योगिक प्रदर्शन भरवली जातात. आता बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणारे नियोजित औद्योगिक प्रदर्शन राज्यातील ग्रामीण भागात तालुकास्तरावरील कदाचित पाहिलेच ठरणार आहे.

या प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी जेष्ठ नेते आदरणीय पवारसाहेब, उपमुखमंत्री अजितदादा पवार व खासदार सुप्रियाताई सुळे यांचे मार्गदर्शन घेतले जाणार आहे. बारामती इंडस्ट्रियल डेवलपमेंट असोसिएशनचे उपाध्यक्ष मनोहर गावडे, सचिव अनंत अवचट, खजिनदार अंबिरशाह शेख वकिल, संचालक मनोज पोतेकर, संभाजी माने, महादेव गायकवाड, हरिभाऊ थोपटे, चंद्रकांत नलवडे, हरीश कुंभारकर, सूर्यकांत रेड्डी, अभिजित शिंदे, राजन नायर, विष्णू दाभाडे, हरीश खाडे, सौ चारुशीला धुमाळ व सौ उज्ज्वला गोसावी या पदाधिकाऱ्यांवर प्रदर्शन आयोजनातील विविध विभागांची जबाबदारी दिली जाणार असून अनेक उद्योजकांना नियोजन समितीत सहभागी करुन घेतले जाणार आहे. या नियोजित औद्योगिक प्रदर्शनाच्या पूर्वतयारीसाठी उद्योजकांची लवकरच बैठक घेतली जाणार असलेची माहिती धनंजय जामदार यांनी दिली.

बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनच्या माध्यमातून आयोजित होणाऱ्या नियोजित औद्योगिक प्रदर्शनास मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा सर्वोतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही अध्यक्ष राजेंद्र मोहिते, सचिव धैर्यशील भोसले, केतन कोटणीस, संग्रामसिंह कोरपे आदींनी बारामती असोसिएशनच्या
शिष्टमंडळाला दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here