अर्था फॅशन शो आणि अर्था इंटरियर एक्जीबिशन 2022 संपन्न
पुणे (प्रतिनिधी): फॅशन डिझायनरच्या विद्यार्थ्यांनी बॉलीवूडला करियरच्या नजरेने पाहायला पाहिजे. नवीन ओळख निर्माण करण्यासाठी बॉलीवूड हे प्रभावी माध्यम आहे. त्याचा फायदा व्ययक्तीक जीवना सोबतच व्यावहारिक पातळीवर देखील मोठ्या प्रमाणात होतो असे मत प्रसिध्द बॉलीवूड फॅशन डझायनर चंद्रकांत सोनवणे यांनी व्यक्त केले.
पुण्यातील नामांकित टाइम्स अँड ट्रेंड अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे कला कौशल्य दर्शवणारा ‘अर्था फॅशन शो 2022’ आज मोठ्या उत्साहात पाहायला मिळाला. या शो मध्ये विद्यार्थ्याकडून नव नवीन स्टाईल, जगात आणि देशात चालू असलेले नवीन ट्रेंड, क्रिएटिव्हिटी प्रेक्षकांना अनुभवायला मिळाली. सोबतच विद्यार्थ्यांकडून अर्था इंटरियर एक्जीबिशन 2022 चे देखील प्रदर्शन यावेळी प्रदर्शित केले होते; या वेळी चंद्रकांत सोनवणे बोलत होते. पुण्यातील अण्णाभाऊ साठे सभागृहात संपन्न झालेल्या अर्था फॅशन शो 2022 ला टी.टी.ए चे मुख्य संचालक अमीत अग्रवाल, रश्मी अग्रवाल, रश्मी अग्रवाल, डायरेक्टर कीर्ती महाजन, स्नेहा पुल्लकवार, प्रमूख पाहूणे म्हणून प्रसिद्ध बॉलिवूड फॅशन डीझायनर चंद्रकांत सोनवणे, भरत पाठक, जय ससाणे, मनश्री शिर्के, मनीष आनंद, गौरव, पराग मिस्त्री उपस्थित होते.
कार्यक्रमा दरम्यान टाइम्स अँड ट्रेंड अकॅडमी मधील विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या स्टाईल मध्ये तैय्यार केलेल्या डीजाईन चे फॅशन शो च्या माध्यमातून प्रदर्शन करण्यात आले. उत्तम डिझाईन आणि इंटरियर प्रॉडक्टसाठी विद्यार्थ्यांना मान्यवरांनी सन्मानित करून त्यांच्या कौशल्यचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.
भरत पाठक म्हणले, इंटेरियर डिझाईन इंडस्ट्री खूप वेगाने पुढे जात आहे. ज्या पद्धतीने शहर सुधारणा मोठया वेगाने होत आहे; त्याचाच चांगला परिणाम इंटेरियर क्षेत्रात पाहायला मिळत आहे. लोग आता थीम बेस इंटेरियर डिझाईनला प्राधान्य देत असल्याने क्रियेटीव्ह विचार करण्याचा माईंड असेल तर उत्तम करिअर या क्षेत्रात विद्यार्थ्यांना आहे. विद्यार्थ्यांनी तैय्यार केलेल्या अर्था इंटेरियर एक्जीबिशन २०२२ मधील प्रॉडक्टचे कौतुक देखील पाठक यांनी केले