प्रा. शितल अमरसिंह गावडे यांना पीएच.डी. प्रदान….

प्रा. शितल अमरसिंह गावडे यांना पीएच.डी. प्रदान....

0
126

प्रा. शितल अमरसिंह गावडे यांना पीएच.डी. प्रदान

बारामती –  तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स विभागातील प्रा.डॉ. शितल अमरसिंह गावडे यांना श्री जगदीशप्रसाद झाबरमल टीबडेवाला विश्वविद्यालय, झुनझुनू (राजस्थान) यांनी नुकतीच पीएच.डी. पदवी प्रदान केली आहे. ‘ इफेक्टिव्ह हार्ट डिसीज प्रेडिक्शन स्टडी युझिंग हायब्रीड रँडम फॉरेस्ट विथ लिनिअर मॉडेल ऑफ मशिन लर्निंग टेक्निक्स’  हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. डॉ.गावडे यांना डॉ.भारत गुप्ता, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग श्री जेजेटी युनिव्हर्सिटी, राजस्थान यांनी शोध निर्देशक म्हणून मार्गदर्शन केले तर तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील डॉ. जगदीश देशपांडे यांनी सहशोध निर्देशक म्हणून मार्गदर्शन केले.  प्रा.डॉ. शितल अमरसिंह गावडे  या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स विभागात  ०९ वर्षांपासून अध्यापन करीत आहेत.  त्यांनी   राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय,   राज्य स्तरावरील विविध परिषदांमध्ये सहभागी होवून संशोधन प्रबंध सादर केलेले आहेत.

प्रा.डॉ. शितल अमरसिंह गावडे  यांना  मिळालेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री.जवाहर शाह वाघोलीकर, सचिव मिलिंद शाह वाघोलीकर, सर्व विश्वस्त, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश जगताप,  उपप्राचार्य डॉ.अशोक काळंगे, डॉ.योगिनी मुळे, डॉ.सचिन गाडेकर, इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे प्रमुख डॉ.जगदीश देशपांडे, रजिस्ट्रार श्री.अभिनंदन शहा, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी अभिनंदन केले आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here