प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल विलेपार्लेच्या जिमनॅस्टपटूंची सब-ज्युनिअर राष्ट्रीय स्पर्धेत पदकांची कमाई.
नुकत्याच पश्चिम बंगाल, कोलकाता येथे पार पडलेल्या सब ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत 14 वर्षांखालील मुलांच्या गटात, अध्ययन देसाई संपूर्ण भारतात तिसरा आणि अमन देवाडिगा भारतात चौथा क्रमांक प्राप्त करत अनुक्रमे 2 कांस्य व 1 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कांस्यपदक जिंकले तसेच जश पारीख ने सुद्धा 2 कांस्यपदके जिंकली. 12 वर्षांखालील मुलांच्या गटात प्रसाद सलापने 1 रौप्य पदक संघ प्रशिक्षक श्री शुभम गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली जिंकले.
आश्रव वर्तक याने महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाला तिसरे स्थान आणि अवंति भावे हिने मुलींच्या संघाला प्रथम स्थान मिळवण्यात मदत केली. ते प्रशिक्षक शैलेन्द्र लाड व अचल रेवाळे यांच्यासोबत प्रशिक्षण घेत आहेत. छञपती शिवाजी महाराज स्मारक समिती संचालित प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल विलेपार्ले चे अध्यक्ष अरविंद रमेश प्रभू, सचिव डॉ. मोहन अ. राणे, जिम्नॅस्टिक्स प्रमुख नीलम बाबरदेसाई यांच्या पाठिंब्यामुळे सातत्याने लहान गटात सुद्धा राष्ट्रीय स्तरावर पदके मिळवण्यात प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुलाला यश प्राप्त करून देत आहेत.