पोलीस दलाच्या वर्दीला माझा सलाम!नका होऊ देऊ या भारतीय नागरिकांना गुलाम!आपल्याकडे आहे सत्यमेव जयतेचे अस्र करा हा देश सुजलाम सुफलाम!

पोलीस दलाच्या वर्दीला माझा सलाम! नका होऊ देऊ या भारतीय नागरिकांना गुलाम! आपल्याकडे आहे सत्यमेव जयतेचे अस्र करा हा देश सुजलाम सुफलाम!

0
287

पोलीस दलाच्या वर्दीला माझा सलाम!
नका होऊ देऊ या भारतीय नागरिकांना गुलाम!
आपल्याकडे आहे सत्यमेव जयतेचे अस्र करा हा देश सुजलाम सुफलाम!
दुर करण्या देशातले रावण राज्य जागा होऊ द्या आपल्यात राम!

आज माझे वय ७७ आहे.पोलीस दलातुन चार दोन वर्षात सेवा निवृत होणारे देखील आज माझ्या मुलाच्या वयाचे असले तरी मी आपणा पुढे लिन होऊन आपणास विनंती करतो.
आपण केवळ वर्तमानात राहु नका तर आधी आपल्या परिवाराचा गावाचा देशाचा भविष्यकाळ पहा.

काय भविष्य आहे. आपल्या मुलाबाळाच या देशाच यांचा विचार आता आपणाला करावा लागणार आहे

सदरक्षणाय, खलनिग्रहणाय…’ असे ब्रीद पोलिसांच्या खाकी वर्दीवर लावलेले आहे. याचा अर्थ सामान्य जनतेला सुरक्षित ठेऊन ‘खल’वृत्तीने वागणाऱ्यांना ठेचण्याचे काम पोलिसांनी करणे अपेक्षित आहे.

गरीबी हा संपुर्ण मानवी समाजासाठी अभिभाष आहे जगात असे एक हि ठिकाण नाही जेथे गरीब माणुस राहत नाही.हि वस्तुस्थिती असली तरी काही देश पुर्णता गरिबीत हलाखीचे कठीण जीवन जगत आहेत. जगातील या गरीब देशाचा विचार केला तर अफ्रीका खंडात जगातील सर्वात अधिक देश गरीब आहेत. गरीब देशाचा विचार केला तर सर्वात अधिक भुके कंगाल देश सोमालिया,मोजाम्बिक लायबेरीया हे देश आहेत दुर्दैवाने आजची राजकीय अराजकता भ्रष्ट नितीमत्ता पाहिली तर या पंक्तीत आपला देश बसु नये.

भारताचा आर्थिक विकास वेगाने होत असे जाणवत असले तरी देशातील बहुसंख्य लोक अतिशय दारिद्र्यात राहत आहे.देशाची लोकसंख्या हि सुमारे एकशे तीस कोटींच्या जवळपास आहे.त्याच्या तीस टक्के जवळपास एकत्रीती अंश लोक दारिद्र रेषेखाली राहतात.हे केवळ भारतातले दारिद्र रेषेचे प्रमाण नाही तर जगाचा लोकसंख्येचा विचार केला तरी हे चित्र भयावह आहे.काही लोकाना अवघ्या साठ पासष्ट रुपयांत गुजराण करावी लागते.

परिणामी कुपोषितपणा अधिक आहे.बालमृत्युचे प्रमाण अधिक आहे.अनेकजण आत्महत्या करतात.देश युवकांचा असला तरी आजचा युवक सुशिक्षित बेकारीचे, बेरोजगारीचे नैराश्येचे जिवन जगत आहे याला जगणे म्हणणार का?

एकेकाळचा कृषी प्रधान देश बेबंदशाहीचा लुटारुचा झाला आहे. जागतिक बँकेच्या सर्व्हेक्षणानुसार ८०/८५ कोटी लोक हे पाच किलो धान्याच्या आधारे जिवन जगत आहेत.

आमचे राजकारणी उठता बसता वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतात शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लावले जात नव्हता.येथे तर दिवसाढवळ्या शेतकरी जमिनी विकुन किंवा दलालांनी त्या बळकावल्यामुळे उध्वस्त होत आहे.

ठायी ठायी रांझ्याच्या पाटलासारखे वासनांध आहेत.कल्याणच्या सुभेदाराची सुन तर दुर येथे क्षणोक्षणी हिंदु मुस्लिम वाद निर्माण करुन राजकारणी आपली सत्ता गाजवत आहे.

आपणच विचार करा साधे पोलीस भरती व्हायला किती कष्ट घ्यावे लागतात शारीरिक मेहनत करावी लागते वजन उंची कडे लक्ष द्यावे लागते.बापाने अर्धपोटी राहुन तयारी करायला दिली साथ पाहीली की, काहींच्या डोळ्यापुढे बापाचे ते कष्ट उभे राहतात व मग स्वतः देखील अर्धपोटी राहुन सराव करुन आपण भरती होता.

अधिकारी व्हायचे तर एम.पी एस सी /युपीएससीचा अभ्यास करावा लागतो.पोटाला चिमटा घेऊन पुस्तक घेतली जातात ऐपत नसली तर मित्राकडुन मागुन घरापासुन दुर राहुन अभ्यास करावा लागतो.कधी कधी अपयश हि यशाची पायरी या विशेषणान स्वतःचे समाधान करु दुसरी पायरी चढली जाते.प्रशिक्षित व्हावे लागते,तेव्हा कुठे ती खाकी वर्दी मिळते.

अशी हि अपार कष्टाने मिळालेली पवित्र वर्दी कोठे तर अडाणी,भ्रष्ट राजकारणी यांचे संरक्षणासाठी त्यांना सॅल्युट मारण्यासाठी वापरावी लागते.हि सिस्टिम असली तरी आपण कोणासाठी काय करतो याचे भान देखील राखले पाहिजे(खरे तर ब्रिटिश कालीन सिस्टीम आहे.व्हाइसराॅयच्या दिमतीला ह्या फौजा असायच्या

मान्य आहे लाखो लोकमधुन हे लोक प्रतिनिधी निवडुन येतात. लोकप्रतिनिधी होतात परंतु हि लोकशाही मार्गाने निवडुन येणारी सिस्टिमच किती भ्रष्ट आहे.काही काळ आदरणीय टी.एन शेषण यांचे मुळे काही अंशी सुधारणा झाली होती.हे आम्ही नाकारु शकत नाही.

या राजकारण्यांचा किती कार्यकाळ असतो.एक पंचवार्षिक फार तर दोन आपणाला जिवनातले ३०/३५ वर्ष सेवेत घालवावी लागते तरी यांना सॅल्युट मारून त्याचे रक्षण करावे लागते.त्या संरक्षणात त्यांनी गरळ ओकायची सामाजिक धार्मिक सुरक्षा या राजकारण्यानी बिघडवायाची या सुरक्षेच्या वाईट परिणामाचे खापर आपल्या माथी यातुन हे राजकारणी आपले हित साधत राहतात.याच वेळी त्यांच्यावर योग्य कलमांचा वापर करुन त्यांचे मनसुबे कलम करता येऊ शकतात ते करण्याचे प्रयत्न केले तर वरीष्ठ दबाब आणतात त्यामुळे हे अधिकाऱ्यांनी देखील आपल्या सहकाऱ्यांच्या पाठीशी उभे राहीले पाहिजे.तरच प्रत्येक अधिकारी ताठ मानेने जगु शकले.प्रामाणिक निती हे सिस्टिमचा बॅक बोन असला पाहिजे तरच पोलीस दल ताठपणे उभे राहुन ताठरपणे वागणाऱ्याच्या अनितीचा कणा मोडुन टाकु शकतात.

क्षणभर अगदीच मनातला वाईट विचार केला तर फार तर या राजकारण्याशी असणाऱ्या सलगी मुळे इतर सहकारी हे वचकुन राहत असतील.परंतु यातुनच जर कधी काळी वाईट प्रसंग आपल्यावर ओढावला तर हेच राजकारणी वाऱ्यावर सोडुन देतात.कठीण समय येता कोण कामास येतो.अशी किती उदाहरणे आहेत.

मलईदार ठिकाण मिळण्यासाठी पोराबाळाच्या तोंडचा घास काढुन ए.सी.बसणिऱ्या मंत्र्याला सचिवाला तो दिला जातो.त्यापेक्षा मिळेल त्या ओसाड ठिकाणी जाऊन तेथे नंदनवन करण्याचे तेथील जनतेच्या गळ्यातला ताईत बनण्याचा धाडशी निर्णय आपण का घेऊ शकत नाही.

चिरीमिरी मिळत हि असेल पर परिंदा दाणा देखता जाल नहीं देखता हेच राजकारण्यानी आपल्याला गुलाम म्हणून वागवत असतात.याची चिड आपणाला येत नाही का, ती आली तर आपले आपल्यालाच कळेल यांचे गुलाम होऊन जगण्या पेक्षा यांच्या कुर्माचा पाढा वाचुन यांच्या मुसक्या आवळुन यांचे चेहरे मुखवटे जनते समोर आणु शकतो. इतकी बलवान शक्ती या वर्दीत आहे.

आपल्या वर्दीला जाग आली तर जनतेला जाग येईल जनता खरी पोलिसांचे केवळ मित्र होतील एवढेच नाही तर त्यांच्यात एक आत्मविश्वास निर्माण होईल मी भ्रष्टाचारा विरुध्द लढा देऊ शकेल.मला चिरीमिरी दिल्याशिवाय राजकारण्याची हांजी केल्याविना मला न्याय मिळवता येईल.तो मला माझा पोलीस मित्रच मिळवुन देईल एक एक करीत अनेक माणसं आत्मनिर्भर होतील

माणसाचे जथेच्या जथे आत्मनिर्भर झाले की,देश खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम होईल जनतेच्या कष्टाच्या टॅक्सची जी उधळपट्टी करुन राजकारणी कोट्यावधीची लुट करीत आहे.त्यांना कळेल वर्दीचा दणका व जनमताचा रेटा आमच्या मुसक्या आवळुन शकतात.या भितीतुन परिवर्तनातुन राजकारणी निश्चितच सुधारतील

त्यांची सुधारणा हि आपल्या सर्वांच्या परिवाराच्या राज्याच्या देशाच्या परिवाराला सक्षम बनविण्याची नांदी ठरेल इतकी ताकत आपल्या वर्दीत आहे.

कानुनके हाथ लंबे होते असे म्हणतात.त्या कायद्याचे रक्षण करणारे आपण आहात म्हणजे आपण अजाणबाहु आहात तेव्हा हेच हात चिरीमिरीच्या भ्रष्टाचारात मलिन होऊ देऊ नका किंवा राजकारण्याचा हातात हात घालुन स्वाभिमान मातीत मिसळुन वर्दीच्या पावित्र्याची माती करु नका तर या देशाच्या मातीला नमन करुन सामान्याचे हात बळकट करा.

आमच्या सारख्या सामाजिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांची किती खस्ता खाल्या किती लढे उभारले तरी भ्रष्टाचार नष्ट होणार नाही तो केवळ आपल्या वर्दाच्या धाकाने कायद्याच्या चौकटीत राहुन नष्ट होईल.याचाच अर्थ सौ सुनहारकी एक लोकहारकी

आमच्या चळवळी या दगडावर डोकं आपटण्या सारख्या तर आपला कायदा हा याच भ्रष्टाचाराच्या दगडाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या करणारा ठरू शकतो.

भ्रष्टाचार हा पराकोटीला पोहचला आहे.अब्जावधी रुपये घेऊन काहीजण परक्या देशात फरार होत आहेत देश कंगाल होत आहेत.याला आपण सावरु शकता अगदी तुम्ही हो माता पिता तुम्ही हो बंधु सखा आपल्या बद्दल आम्ही म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही तर हे त्रिकाल कोणीही नाकारणार नाही आपल्या वर्दीतला आत्मा जगा झाला पाहीजे तरच देशाच भवितव्य प्रकाशमान राहिलं.

यातील अत्यंत कटु मुद्दे मला मांडण्यासाठी माझा अर्तआत्मा का जागा तर ऐन तारुण्यात भगतसिंग सुखदेव राजगुरू आझाद शिरिष कुमार असे हजारो ज्ञात अज्ञात शहीद झाले व स्वातंत्र्य मिळाले परंतु या स्वातंत्र्याचे आज काय भ्रष्टाचाराने गुंडगिरी मालमत्ता त्यातुन सत्ता हे दुष्टचक्र सुरु आहे जुने संस्थानिक जाऊन हे नवे संस्थानिक उदयाला येऊ लागले.हे असेच चालु राहिले तर एक दिवस हा देश भिकेला लागेल किंवा आज पक्षाला गद्दार होऊन भ्रष्टाचाराची उब घेण्यापायी अप्रत्याक्षात पक्षश्रेष्ठींनी गुलामीत जगणारे कोणाला तरी फितुर होऊन देशांशी देखील गद्दार होऊन शकतात.हे जाणुन घेण्यासाठी बुध्दीला ताण द्यायची देखील गरज नाही.तुमची आमची सदसद्विवेकबुद्धी जागी झाली तर हे‌ धोके सहज लक्षात येऊ शकतील व यातुन दुष्टचक्राने घात होणारे भविष्य हे खाकीच कायद्याचे क्रांतीकारक होऊ सावरु शकतात देश हा वाचवु शकतात ते खाकीतले पोलीस देश वाचविणे आता आपले हातात आहे.आपल्या हातात कायदा आहे गुन्हेगारांच्या हातात घालणारी बेडी आहे.न्याय देवते पर्यंत नेणारे कायदे आहेत.मोगलानाच काय मोगलाच्या घोड्यांना देखील पाण्यात संताजी धनाजी दिसायचे तसे भ्रष्टाचारी राजकर्त्याना ठायीठायी पोलीस व कायदाचा बडगा दिसला पाहिजे.या आधी देखील पोलीस दलाला स्वायत्तता असली पाहीजे हा लेख याच उद्देशाने लिहला होता


आण्णा धगाटे जेष्ठ साहित्यिक सामाजिक कार्यकर्ता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here