पुन्हा रंगणार चित्त थरारक ..बारामतीत कारभारी प्रीमियर लीग ( Kpl ) स्पर्धा….!

0
229

पुन्हा रंगणार चित्त थरारक ..बारामती कारभारी प्रीमियर लीग
( Kpl ) स्पर्धा….!

संतोष शिंदे :-
बारामतीत आज घडीला सर्वांगीण विकास होतो आहे. त्याच प्रमाणे बारामतीच्या नावलौकिकास कारभारी (अण्णा) चॅरिटेबल फाउंडेशन च्या वतीने क्रिकेट kpl च्या
माध्यमातुन बळ मिळते आहे.
२०-२० क्रिकेट सामने यापूर्वीही कारभारी चॅरिटेबल फाउंडेशन माध्यमातून केपीएल क्रिकेट स्पर्धा २०१४ ला आयोजित केली , त्याची दूरवर चर्चाही रंगतदार झालेली आहे..
विविध राज्यातील क्रिकेटपटूंनी बारामतीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमच्या माध्यमातून अनेक दिग्गज हरहुन्नरी क्रिकेटपटूंच्या व त्यांच्यातील क्रिकेट खेळाची चुणूक अनेक बारामतीतील क्रिकेटप्रेमी प्रेक्षकांना पाहिला मिळालेली आहे . बारामतीच्या क्रिकेटच्या मैदान व के पी एल च्या माध्यमातून पुन्हा होणार दुष्टपुष्ट परफेक्ट क्रिकेटर खेळाडू पाहिला मिळणार आहेत.कारभारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम २०१४जुन्या आठवणींना उजाळा मिळणार आहे .त्या फायनलला भरगच्च मैदान भरले होते की स्वतः आदरणीय शरद पवार साहेबांनी बारामतीतील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमची माहिती घेतली व स्टेडियम सुधारणा करण्याच्या सूचना केल्या होत्या व

नगर परिषदेच्या माध्यमातून स्टेडियमचे काम आदरणीय तत्कालीन बारामतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष सुभाषजी ढोले यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून

दक्षिण आफ्रिकेतून खेळपट्ट्यासाठी गवत येणार असल्याचे सांगितलेले होते. खेळ पट्ट्या पूर्णत्वास आणण्यासाठी दक्षिण आफ्रिकेतून आणलेले पवार साहेबांनी ते गवत लागले व खेळपट्ट्या खास बनवल्या गेल्या व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम पूर्णत्वास आले हे महत्त्वाचे तर राज्यस्तरीय सामने कारभारी चॅरिटेबल फाउंडेशनने या मैदानाला उजाळा दिला होता २० ते २५ हजार प्रेक्षक पेक्षा जास्त खचाखच भरलेले मैदान के पी एल च्या माध्यमातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमला फायनलला क्रिकेट प्रेमी उपस्थित होते २०१४ साली हे या मैदानाने खेचलेल्या गर्दीचे वैशिष्ट ठरले गेले होते. तोच अंदाज घेत त्यावेळी साप्ताहिक भावनगरी वृत्तपत्राने बातमी केली होती की हे स्टेडियम जर कारभार चॅरिटेबल फाउंडेशनला वर्ग केले तर बारामतीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू नक्कीच घडतील.. बारामतीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम व कारभारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून घडतील हे वृत्त होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम ची दुरुस्ती खेळपट्ट्या दुरुस्ती व स्टेडियम पूर्णत्वास २०१६ साली आले .

व बारामतीच्या विकासात्मक दृष्टीक्षेपेस हे मैदान आले मात्र या वेळी आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेब अजितदादा सुप्रियाताई सुळे भारताचे लिटल मास्टर क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर व अजिंक्य रहाणे यांच्या उपस्थितीत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर प्रेक्षणीय सामना झाला. त्यावेळी केलेले भावनगरी वृत्तपत्रातून भाकित आज २०२३ ला ते भावनगरी वृत्तपत्रातील लेखन खरे ठरेल काय..!
अशी आशा व्यक्त करण्यास हरकत नाही.तशी चर्चाही बारामतीत बारामतीच्या क्रिकेट प्रेमीतून व्यक्त होत आहे.

मा.उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते श्री.अजित दादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आयोजित के पी एल स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेची दूरवर चर्चा तेव्हाच जाईल व आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनाही खऱ्या अर्थाने त्यांनी भूषविलेले – बी सी सी आय व आय सी सी आय चे अध्यक्षपद भूषविले त्यांना बारामतीच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमच्या माध्यमातून येणाऱ्या काळात आपल्या बारामतीतून एखादा आंतरराष्ट्रीय क्रिकेटर बनला तर बारामतीकरांचे, पवार साहेबांचे नक्कीच स्वप्न साकार होईल यात तीळ मात्र शंका नाही हीच तमाम बारामतीच्या क्रिकेट प्रेमीतून चर्चाही होत असते तरच पवार साहेबांना व अजित दादांना समाधान वाटेल असे वाटते. या सर्व प्रक्रियेसाठी कारभारी चॅरिटेबल फाउंडेशनला स्पोर्ट करणे तितकेच येणाऱ्या काळात स्पर्धेसाठी महत्त्वाचे ही ठरेल अशी आशा व्यक्त करायला काय हरकत आहे..!?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here