पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रक्तदान शिबीर संपन्न

0
77

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रक्तदान शिबीर संपन्न

बारामती, दि. २४: पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या २९९ व्या जयंतीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय बारामती येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.

यावेळी माजी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते पाटील, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, डॉ. प्रज्ञा भालेराव, डॉ. विवेक सहस्त्रबुद्धे, ,डॉ.राजेश उमप सर, प्रशासकीय अधिकारी नंदकुमार कोकरे, अधिसेविका सिमा चव्हाण आदी उपस्थित होते.

या शिबीरात महाविद्यालयातील डॉक्टर, परिचारिका, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत रक्तदान केले. एकूण २२५ इतक्या रक्ताच्या बाटल्या संकलित झाल्या असून त्याचा गरजू रूग्णांना लाभ होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here