देऊळगाव रसाळ येथे ७ दिवशीय शिबिर संपन्न ..!पर्यावरण जागृती, मतदार जनजागृती, अन्नसुरक्षा जनजागृती, जल-संधारण, ग्राम-मंदिर स्वच्छता, वृक्षारोपण, ग्रंथ-दिंडी, पथनाट्य, सांस्कृतिक कार्यक्रम..

0
186

प्रतिनिधी :BHAVNAGARI

विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय तसेच वसंतराव पवार विधी महाविद्यालय, बारामती आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष श्रम संस्कार शिबीर संपन्न.
विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय तसेच वसंतराव पवार विधी महाविद्यालय, बारामती आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत, “युवकांचा ध्यास, ग्राम शहर विकास’ या उपक्रमांतर्गत ‘विशेष श्रमसंस्कार शिबिर मंगळवार दि. १७ जानेवारी ते सोमवार दि. २३ जानेवारी २०२३ या कालावधीत देऊळगाव रसाळ येथे मोठ्या उत्साहात पार पडले. सदर शिबिराचा शुभारंभ प्राचार्य डॉ. अतुल शहाणे यांचे हस्ते तसेच सरपंच सौ. वैशाली वाबळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या सात दिवसीय शिबिरामध्ये स्वयंसेवकांनी पर्यावरण जागृती, मतदार जनजागृती, अन्न सुरक्षा जनजागृती, जल-संधारण, ग्राम-मंदिर स्वच्छता, वृक्षारोपण, ग्रंथ-दिंडी, पथनाट्य, सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी समाज प्रबोधनपर उपक्रम राबविले.
त्याच बरोबर स्वयंसेवकांसाठी सातही दिवस योगा तसेच उपयुक्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. श्री. विजय पाटील, तहसीलदार बारामती, पो. नि. श्री. शेख व पो. नि. साळुंखे व रा. से. यो. जिल्हा समन्वयक डॉ. विलास कर्डिले यांनी शिबिरास सदिच्छा भेट दिली व स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. हे शिबीर यशस्वी होण्यासाठी प्राचार्य डॉ. आर. एस. बिचकर, सरपंच सौ. वैशाली वाबळे, उपसरपंच श्री. दत्तात्रय वाबळे, मुख्याध्यापक. श्री. तावरे, श्री. आनंद रसाळ आणि श्री. दिपकनाना वाबळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
शिबिराचा समारोप समारंभ मुख्याध्यापक श्री. तावरे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच सरपंच सौ. वैशाली वाबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी स्वयंसेवकांनी आपले अनुभव व मनोगत व्यक्त केले. या शिबिराबद्दल देऊळगाव रसाळ ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here