दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरु

0
9

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरु

बारामती, दि. ५ : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये दुष्काळी परिस्थितीमुळे पिकांसाठी ‘ट्रिगर-१’ लागू झाला असून, पिकांच्या झालेल्या नुकसानीचे प्रत्यक्ष शेतावर जाऊन पंचनामे करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पंचनामा प्रक्रियेसाठी ग्राम महसूल अधिकारी, ग्रामविकास अधिकारी तसेच सहायक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे व माहिती उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सचिन हाके बारामती यांनी केले आहे.

पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांनी ७/१२ उतारा (सातबारा उताऱ्यावर संबंधित पीक पाहणीची नोंद असणे आवश्यक), ८-अ उतारा, शेतकरी ओळख क्रमांक, आधारकार्डची प्रत, बँक पासबुकची प्रत तसेच नुकसान झालेल्या पिकाचा भौगोलिक संदर्भासह छायाचित्र (जिओ-टॅग फोटो) उपलब्ध ठेवावे.

पिकांच्या नुकसानीची अचूक व वस्तुनिष्ठ नोंद होण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी पंचनामा करणारे अधिकारी व कर्मचारी यांना आवश्यक सहकार्य करावे. तसेच आवश्यक कागदपत्रे वेळेत उपलब्ध करून देऊन पंचनामा करताना प्रत्यक्ष शेतावर उपस्थित रहावे, असे आवाहनही श्री. हाके यांनी केले आहे.
००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here