डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, आमराई येथे आंबेडकर जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी
बारामती (प्रतिनिधी):
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, आमराई येथे अत्यंत उत्साही वातावरणात विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन मा. उपनगराध्यक्ष बिरजू भैय्या मांढरे मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अन्य थोर महापुरुषांच्या प्रतिमांचे विधीवत पूजन करण्यात आले. यानंतर भव्य पूजा-पाठ व सामूहिक प्रार्थना झाली. कार्यक्रमानंतर सर्व नागरिकांना मिठाईचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाला बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे, मा. उपनगराध्यक्ष भारत अहिवळे, नगरसेवक राजेंद्र बनकर, बाळासाहेब जाधव, रमेश साबळे, शुभम अहिवळे, अरविंद बगाडे, शुभम ठोंबरे, उत्तम धोत्रे, सिद्धार्थ सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात बिरजू भैय्या मांढरे यांनी सांगितले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक ऐक्य, बंधुता आणि त्यांच्या विचारांचा प्रसार हा प्रमुख उद्देश असून, या निमित्ताने समाजातील सर्व घटकांना एकत्र आणण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.”

मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी आपल्या भाषणात डॉ. आंबेडकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकताना सांगितले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजही प्रेरणादायी असून, ते समाज परिवर्तनाचे महान अधिष्ठान आहेत.”
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विजय तेलंगे, किरण बोराडे, सोमेश सुतार, राजू मांढरे, ओंकार जाधव, चंद्रकांत कसबे, महेश सुतार, नितीन फासगे, राहुल कसबे, धनंजय तेलंगे, सचिन मांढरे, रामभाऊ नवगिरे, कालिदास बल्लाळ आदींनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे शाब्दिक स्वागत धनंजय तेलंगे यांनी केले, तर राजू मांढरे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले

