डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसाहत येथे महामानवाला अभिवादन

0
172

डॉ बाबासाहेब आंबेडकर वसाहत येथे महामानवाला अभिवादन

बारामती: डॉ बाबासाहेब आंबेडकर एक विचार या विषयावर वक्तृत्व स्पर्धा, डॉ आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार व प्रसार होणेसाठी पुस्तके वाटप, वृक्षरोपण साठी रोपटे वाटप व लाडू वाटप आदी कार्यक्रमाच्या माध्यमातून मा.उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे व सहकारी यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली.

या वेळी मा.नगरसेवक किरण गुजर, सुधीर पानसरे, मा. उपनगराध्यक्ष,अभिजित जाधव,भारत अहिवळे, शुभम अहिवळे, बबनराव लोंढे,धनंजय तेलंगे,आर पी आय चे सचिव ऍड सुनील शिंदे,मातंग एकता आंदोलन चे पुणे जिल्हा अध्यक्ष राजू मांढरे व ऍड अमृत नेटके,प्रा शिंदे ,प्रा इंगळे, शेलार सर, खंडाळे सर, आवारे सर, भाऊसो घोलप, संतोष खंडाळे, घेरे सर, विनोद शिंदे, पत्रकार निलेश जाधव, चेतन शिंदे, तैनूर शेख, व सूरज कुचेकर, दादासो भिसे, माणिकराव अडागळे, अमोल अडागळे, व इतर मान्यवर उपस्थित होते.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार बालवयापासून रुजवावेत या साठी पुस्तकालय सारखे उपक्रम सुरू करून वक्तृत्वकला,वृक्षारोपण साठी सहकार्य ,व्यसन मुक्ती आदी माध्यमातून बाबासाहेब यांना अभिप्रेत असलेले कार्य बिरजू मांढरे करीत आहेत ही बाब कौतुकास्पद असल्याचे किरण गुजर यांनी सांगितले.

शिका संघटित व्हा व संघर्ष करा या विचारातून विविध महापुरुषाच्या जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रम राबवून आंबेडकर वादी विचार तळागाळात पोचविण्याचे छोटेसे कार्य सर्वांच्या सहकार्याने करीत असल्याचे आयोजक बिरजू मांढरे यांनी सांगितले.

सायली चव्हाण,अंजली दिवटे,अंकिता दिवटे यांना वक्तृत्वकला बदल सन्मानित करण्यात आले.किरण बोराडे,विजय तेलंगे,
कृष्णा कांबळे,अंकुश मांढरे तुषार शिंदे,स्वामेश सुतार
ऋषिकेश मांढरे,मयुर सुतार सचिन मांढरे मोहन सुतार
चंद्रकांत कसबे आदींनी सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले या प्रसंगी प्रा. इंगळे, प्रा शिंदे आदींनी विचार व्यक्त केले . अनिल सावळेपाटील यांनी सूत्रसंचालन केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here