झारगडवाडी येथे बारामती बाजार समितीचे नवीन उपबाजार आवाराचे भूमीपुजन

0
33

झारगडवाडी येथे बारामती बाजार समितीचे नवीन उपबाजार आवाराचे भूमीपुजन

झारगडवाडी येथे नवीन उपबाजार आवाराचे भूमीपुजन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री मा.अजितदादा पवारसो यांचे शुभहस्ते मंगळवार दि. ८ ऑक्टोबर २०२४ रोजी संपन्न झाले. बारामती बाजार समिती ही शेतकरी हिताचे काम करीत असुन बाजार घटकांना उत्कृष्ठ सोई सुविधा पुरवित आहे. झारगडवाडी या नवीन उपबाजारामुळे शेतक-यांना शेतमाल विक्रीची सोय होणार आहे. तसेच भविष्यात या ठिाकणी जनावरे बाजार भरविला जाणार आहे. या सुविधांमुळे झारगडवाडी व परिसरातील गावांना याचा फायदा होणार असुन एक नवीन बाजारपेठ निर्माण होणार असल्याचे मत यावेळी व्यक्त केले.
झारगडवाडी येथील सरकारी/ गायरान जमीन गट नं. ४४६ मधील २१ एकर क्षेत्र बारामती बाजार समितीस दादांच्या सहकार्यातुन शासनाकडुन उपबाजार आवार विकसित करणेसाठी विनामुल्य कब्जे हक्काने मिळाली आहे. यापुर्वी २००५ मध्ये जळोची येथे ४२ एकर व २०२१ मध्ये सुपे येथे १७ एकर जमीन आणि समितीची बारामती येथे २८ एकर, सुपे उपबाजार करिता ३ एकर असे मिळुन आता समितीचे एकुण १११ एकर क्षेत्र झाले आहे. यामध्ये मा. अजितदादांचे मोठे योगदान असुन त्यांचेच मार्गदर्शाखाली समितीने शेतकरी व व्यापा-यांना पुरविलेल्या सुविधां व राबविलेले विविध उपक्रम यामुळे समितीचा विस्तार व विकास होत आहे असे सभापती सुनिल पवार यांनी प्रास्ताविकात सांगितले.
यावेळी विश्वासराव देवकाते, संभाजी होळकर, किरण गुजर, केशवराव जगताप, मदन देवकाते, दत्तात्रय येळे, योगेश जगताप, पोपटराव गावडे, अशोक नवले, अजित बोरकर, नारायण कोळेकर, राजेंद्र बोरकर, सौ. मंदाकिनी निकम, कुंदन देवकाते आणि समितीचे उपसभापती निलेश लडकत, सदस्य बापुराव कोकरे, दत्तात्रय तावरे, सतिश जगताप, विश्वास आटोळे, युवराज देवकाते, सौ, शोभा कदम, सौ. प्रतिभा परकाळे, शुभम ठोंबरे, रामचंद्र खलाटे, अरूण सकट, संतोष आटोळे, मिलिंद सालपे, नितीन सरक, प्रमोद दुरगुडे सहाय्यक निबंधक तसेच झारगडवाडी व परिसरातील पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. सुत्रसंचलन विनायक गावडे यांनी केले तर आभार समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here