छत्रपती शिवाजी महाराज जयंती: हिंदवी स्वराज्याचे प्रेरणास्त्रोत
१९ फेब्रुवारी हा दिवस समस्त मराठीजनांसाठी आणि भारतीयांसाठी अभिमानाचा दिवस आहे. याच दिवशी १६३० मध्ये शिवनेरी गडावर माता जिजाऊंच्या पोटी भारताच्या इतिहासातील महान योद्धा, कुशल प्रशासक आणि आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला.
शिवाजी महाराजांनी केवळ एक साम्राज्य स्थापन केले नाही, तर अन्यायाविरोधात संघर्ष करून स्वराज्याचा आदर्श घालून दिला. त्यांची युद्धनीती, गनिमी कावा, प्रशासनाची दूरदृष्टी, जलदुर्गांची उभारणी आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना ही आजही मार्गदर्शक आहे. महाराजांनी स्त्री-सन्मान, धार्मिक सहिष्णुता आणि न्यायदेवतेचे पालन यासारख्या अनेक सामाजिक मूल्यांवर भर दिला.
आजच्या युगातही त्यांचे विचार आणि कार्य हे नव्या पिढीला प्रेरणा देणारे आहेत. त्यांचा स्वाभिमान, नेतृत्वगुण आणि लोककल्याणकारी धोरणे ही आधुनिक व्यवस्थेने आत्मसात करावी, अशीच अपेक्षा.
सा. भावनगरीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन!
जय भवानी! जय शिवाजी!
