गुरु-शिष्य जयंतीनिमित्त शिव-फुले-शाहू-आंबेडकर प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम…!
जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन..
बारामती (दि:११)
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त शिव फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठान यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन अनंत आशा नगर येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर होलार समाज मंदिर येथे करण्यात आले आहे.
गुरु-शिष्य जयंतीनिमित्त शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रतिष्ठानच्या वतीने अभिवादन करण्यात आले. दरम्यान ११ एप्रिल रोजी सौजन्य हिंद लॅब बारामती रक्ततपासणी शिबीर, पुणे संचलित मोफत मोतीबिंदु निदान व नेत्रतपासणी शिबीरचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तर शुक्रवार १२ एप्रिल रोजी शासकीय उपजिल्हा रुग्णालय येथील रुग्णांना फळे वाटप, शनिवार १३ एप्रिल रोजी अभिवादन रॅली तसेच रविवार १४ एप्रिल रोजी लाडू वाटप कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती
शिव-फुले-शाहू-आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष बंटी नाना गायकवाड यांनी दिली.
शिव फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठानचे हे प्रथम वर्ष असून प्रतिष्ठानने प्रथम वर्षी विविध सामाजिक उपक्रमांनी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती उत्साहात साजरा केली आहे. ११ एप्रिल रोजी सौजन्य हिंद लॅब बारामती रक्ततपासणी शिबीर, पुणे संचलित मोफत मोतीबिंदु निदान व नेत्रतपासणी शिबीरास नागरिकांनी मोठ्या प्रमाणत गर्दी केल्याचं पाहिला मिळाले. यावेळी राजकीय, सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी या उपक्रमास भेट दिली.