खोटं बोललो तर पवारांची अवलाद सांगणार नाही – अजित पवार

0
201
खोटं बोललो तर पवारांची अवलाद सांगणार नाही - अजित पवार
खोटं बोललो तर पवारांची अवलाद सांगणार नाही - अजित पवार

खोटं बोललो तर पवारांची अवलाद सांगणार नाही – अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे.

त्याचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटलेले कालआपल्या सर्वांना टी.व्हीं.वरून पाहिला मिळाले . विशेष बाब म्हणजे एकाच दिवशी एकीकडे अजित पवार गट तर दुसरीकडे शरद पवार गट या दोघांनी एकाच वेळी मुंबई येथे वेगवेगळ्या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आली . या बैठकीत बोलताना अजित पवारांनी त्यांची सविस्तर भूमिका स्पष्ट केली. आणि अजित पवारांनी थेट शरद पवारांना लक्ष करताना त्यांच्या विविध भूमिकावर आक्षेप नोंदविला.

यावेळी अप्रत्यक्षपणे अजित पवारांनी शरद पवारावर निवृत्ती संदर्भातही टीका केली.

2014 ला बाहेरून पाठिंबा दिला अजित पवार यावेळी अजित पवारांनी 2014 मध्ये घडलेल्या घडामोडीचा उल्लेख केला .

2014 मध्ये प्रफुल्ल पटेल याचे शरद पवारांशी बोलणं झालं नंतर प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केलं की आम्ही बाहेरून भाजपला पाठिंबा देतो.

आम्ही गप्प बसलो काय तर नेत्यांचा निर्णय देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्री झाले तेव्हा आम्हाला सांगितलं की सगळ्यांनी वानखेडेला शपथविधीला जा. नरेंद्र मोदी मला ओळखतात .

ते आमच्याशी बोलले. तेव्हा त्यांच्यासोबत जायचं नव्हतं तर आम्हाला तिथं का पाठवलं काय …!

मंत्रिमंडळाच्या शपथविधीला का पाठवलं ? असा सवाल अजित पवारांनी शरद पवारांच्या निर्णयावर उपस्थित केला .

2017 ला काय घडलं होतं अजित पवारांनी 2017 ला घडलेल्या घडामोडी बैठकाविषयी गोप्येंस्फोट केला. 2017 ला वर्षा बंगल्यावर चर्चा झाली. मी सुनील तटकरे जयंत पाटील आणि अजून एक असे चार जण होतो समोर सुधीर मुनगंटीवार देवेंद्र फडवणीस विनोद तावडे चंद्रकांत पाटील हे चौघे होते. कुठली खाती कुठले पालकमंत्री पद हे सगळं ठरलं होतं. मी खोटं बोलत नाही खोटं बोललो तर पवारांची अवलाद सांगणार नाही.

आम्हाला निरोप आला सुनील तटकरे यांना दिल्लीला बोलावलं. त्यांच्या वरिष्ठांनी सांगितलं 25 वर्षाचा आमचा मित्र पक्ष असणाऱ्या शिवसेनेला आम्ही सोडणार नाही. ते म्हणाले शिवसेनाही आघाडीत राहील. आपल्या वरिष्ठांना ते मान्य नव्हतं. ते म्हणाले शिवसेना आम्हाला चालणार नाही.

शिवसेना जातीवादी आहे. अशा शब्दात अजित पवारांनी त्यावेळच्या घटना सांगितल्या. 2019 चा तो शपथविधी आणि राजकीय घडामोडी दरम्यान यावेळी 2019 घेतलेल्या पहाटेच्या शपथविधी यादी घडलेल्या घडामोडीवर ही अजित पवारांनी यावेळी भाष्य केलं. 2019 ला निकाल लागले.

मोठ्या उद्योगपतीच्या घरी आपले वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल ते उद्योगपती भाजपचे वरिष्ठ नेते मी देवेंद्र फडवणीस सगळी चर्चा झाली .मात्र बैठका झाल्या. मला आणि देवेंद्रला आपल्या नेत्यांनी सांगितले की कुठे बोलायचं नाही. मग मी का बोलेन कुठे ? नंतर अचानक बदल झाला .आणि सांगितलं की आपण शिवसेनेबरोबर जायचं. मला सांगा, 2017 ला शिवसेना जातीवादी असल्याचं सांगत त्यांच्याबरोबर जायचं नाही असं म्हटलं मग असा काय चमत्कार झाला की दोन वर्षांनी शिवसेना मित्रपक्ष झाला? ज्या भाजपबरोबर जायचं होतं तो जातीवादी कसा झाला ? असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला..! वरिष्ठांनी आता थांबावे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे पुरेसे संख्याबळ असतानाही पक्षाच्या हातून 2004 मध्ये मुख्यमंत्रीपद गेले त्यानंतरही वेळोवेळी हेच होत गेले अगदी गेल्या वर्षापर्यंत प्रत्येक वेळी वरिष्ठांच्या चुकीमुळे मुख्यमंत्रीपद हातचे गेले आम्ही प्रशासन चालवण्यास असमर्थ आहोत काय असा सवाल करत शरद पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर उपमुख्यमंत्री पद अजित पवार यांनी जोरदार टीका केली आमचे वरिष्ठ हे दैवत आहेत पण त्यांनी आता थांबले पाहिजे हट्टीपणा सोडून आम्हाला सल्ला देण्याचे काम आशीर्वाद द्यावेत असेही अजितदादा म्हणाले.

मुंबईच्या वांद्रे येथील एम. ई. टी. कॉलेजच्या मैदानावर अजित पवार यांनी समर्थकांचा मेळावा घेतला यावेळी बोलताना शरद पवार यांचे नाव घेण्याचे अजित पवार यांनी टाळले मात्र त्यांच्यावर जोरदार हल्ला करीत वरिष्ठ हे आमचे दैवत आहे असे सांगत त्यांनी वरिष्ठांनीच अवमानघात केल्याचे पक्षाचे नुकसान तर आमदार खासदार कमी होत गेले. सोडून गेले.

असे नमूद केले मात्र- काल झालेल्या दोन्ही मेळाव्यातून दादा विरुद्ध ताई ? असा सामना रंगताना दिसतो आहे …! सुप्रिया सुळे यांनी म्हटले की माझ्या आई बापा विषयी कोणी काही बोलले तर मी खपवून घेणार नाही…! कोण म्हणते की ज्येष्ठांचे वय झाले थांबले पाहिजे. आजही टीव्हीवर प्रत्येक जण पाहतो आहे की जाहिरातीमध्ये अमिताभ बच्चन हे टीव्ही वरती आजही पॉप्युलर आहेत. रतन टाटा आजही उद्योगधंद्यामध्ये टॉपर आहे. आणि ज्येष्ठांच्या वयाबद्दल कोणीही बोलू नये तितक्याच ताकतीने आजही पवार साहेब पक्षामध्ये काम करताना पाहत आहोत तो पावसात भिजलेला फोटो आजही इतिहास सांगतो आहे .

ज्या ज्यावेळी पक्ष अडचणीत वाटला त्यावेळेस साहेबांनी पक्षाला उभारी दिलेली आहे असेही मुंबई येथील आयोजित पक्षाच्या बैठकीत सुप्रिया सुळे म्हणाल्या.

“गेलेल्यांची चिंता नको’ – शरद पवार शरदचंद्रजी पवार साहेब म्हणाले की गेल्याची चिंता नको…… जे गेले त्यांचे चिंता करू नका राज्यभरात नव्या पिढीला सोबत घेऊन नेतृत्वाची नवी पिढी उभारण्यासाठी मशाली पेटवू या अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संघर्षाचा शंख नाद केला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मध्ये शरद पवार गटांची राज्यस्तरीय बैठक बोलावण्यात आले होते त्यावेळी पवार बोलत होते राज्यातून आलेल्या शरद पवार समर्थकांनी सभागृहात गर्दी केली होती शरद पवार म्हणाले की जे बाहेर गेले त्यांनी पक्षाने चिन्हावर दावा केला आहे पण मी पक्षाने चिन्ह कदापि जाऊ देणार नाही जे पक्षाबाहेर गेले त्यांच्याबाबत दुःख वाटते पण त्यांची मला चिंता करू नका या 24 वर्षात अनेक नवे चेहरे महाराष्ट्राच्या राजकारणात उभे केले नेते केले.

राज्यातील जनतेला समाधान लाभेल असे काम उभे करावे हाच उद्देश होता आता जे झाले त्यातून पुन्हा नव्या जोमाने राज्यभर नवे चेहरे उभे करूया शरद पवार यांनी भारतीय जनता पक्षावर देखील टीका केली ते म्हणाले ज्यांच्या हातात देशाची जनता सुखी नाही अशांच्या हातात आज सत्ता आहे या सत्ताधारी नेतृत्वाने संसदीय लोकशाहीतला संवाद पूर्णतः संपविला आहे शरद पवार म्हणाले पांडुरंग म्हणायचे अन – दुर्लक्ष झाल्याचा आरोप करायचा . राष्ट्रवादीचे चिन्ह कुठेही जाणार नाही . माझ्याशिवाय नाणे वाजणार नाही. हे त्यांना माहित आहे. भाजपसोबत जे पक्ष गेले त्यांचे अस्तित्व संपले आहे. शिवसेनेचे हिंदुत्व सगळ्यात जातींना सोबत घेऊन जाणारे भाजपचे हिंदुत्व विकारी मनुवादी आणि विद्वेषक आहे. पंतप्रधान मोदी कोणत्याही पुराव्याशिवाय आरोप करतात. जो राजकीय विचार मान्य नाही. त्या पंक्तीला बसणे योग्य नव्हे. आम्ही सगळे सत्ताधारी पक्षात नव्हे तर जनतेमध्ये आहोत. असेही आयोजित मुंबई येथे पक्षाच्या बैठकीत शरद पवार यांनी मार्गदर्शन कार्यकर्त्यांना केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here