श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या प्रांगणात महिलांच्या प्रचंड गर्दीत आणि उत्साहपूर्ण वातावरणात ‘खेळ पैठणीचा’ हा कार्यक्रम पार पडला.. प्रपंचाच्या जबाबदारीत गुंतलेल्या महिलांना विविध खेळांमध्ये सहभाग घेण्याची संधी या निमित्तानं मिळाली.. उखाण्यांपासून विविध खेळांमध्ये आपलं कौशल्य दाखवणाऱ्या महिलांचं आगळंवेगळं रुप या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनुभवता आलं..
अजितदादांनी अर्थसंकल्पात जाहिर केलेल्या लाडकी बहिण योजनेबद्दल समाधान व्यक्त करत यापुढेही ही योजना सुरु ठेवावी अशी अपेक्षा उपस्थित महिला भगिनींनी व्यक्त केली.. कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त असलेल्या या महिला भगिनींचा उत्साह मनाला भावणारा होता..