कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांची बारामतीतील गुडलक हेअर ड्रेसिंग हॉलला सदिच्छा भेट
महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा इंदापूर मतदारसंघाचे आमदार माननीय श्री दत्तात्रय (मामा) भरणे यांनी बारामती येथील गुडलक हेअर ड्रेसिंग हॉलला सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान, राजेंद्र दत्तात्रय माने आणि राजेंद्र माने यांच्या पुतण्यांनी भरणे यांचे कॅबिनेट मंत्रीपदी नियुक्तीबद्दल अभिनंदन केले. या प्रसंगी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली आणि भरणे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
दत्तात्रय भरणे यांनी जुने संबंध राखत, सामान्यांशी असलेली आपुलकी कायम ठेवत, गुडलक हेअर ड्रेसिंग हॉलला भेट दिली. मंत्रीपदावर असूनही लोकांमध्ये सहज मिसळणाऱ्या त्यांच्या साध्या स्वभावाने सर्वांनाच भारावून टाकले. मंत्री झाल्यानंतरही त्यांनी सामान्य कुटुंबाशी नातं तोडलं नाही, ही त्यांची वैशिष्ट्यपूर्ण भूमिका लोकांच्या मनाला भावणारी ठरली आहे.
माने कुटुंबाने केलेल्या या जोरदार स्वागताने आणि शुभेच्छा दिल्याने त्यांच्या साधेपणाला अधोरेखित केलं आहे. दत्तामामा भरणे यांच्या या भेटीमुळे लोकनेते आणि जनतेमधील अंतर कमी झाल्याचे दिसून येते. त्यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाचा हा एक नमुना असून त्यांच्या जमिनीशी जोडलेल्या वृत्तीची प्रशंसा होत आहे.
“नेता असावा तर भरणे मामा सारखा,” अशा शब्दांत त्यांच्या साधेपणाचं आणि लोकाभिमुखतेचं कौतुक समाजात सर्वत्र होत आहे.