
बारामती प्रतिनिधी:
बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती पदी विश्वास तानाजी आटोळे रा. शिर्सुफळ तर उपसभापती पदी रामचंद्र शामराव खलाटे रा. शिरष्णे यांची बिनविरोध निवड झाली. सुनिल वसंतराव पवार व निलेश भगवान लडकत यांनी सभापती व उपसभापती पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागी सभापती म्हणुन श्री. आटोळे तर उपसभापती पदी श्री. खलाटे यांची निवड आजचे मा. संचालक मंडळ विशेष सभेत करण्यात आली आहे. बारामती बाजार समितीला राज्यात प्रथम नामांकन मिळालेल्या संस्थेवर काम करणेची संधी मिळाल्याने समाधान होत असल्याचे मत नवनिर्वाचित सभापती यांनी व्यक्त केले. बाजार समिती ही शेतक-यांसाठी असुन शेतकरी हिताचे व बाजार घटकांसाठी शोभेल असेच काम करीत राहु अशी ग्वाही सभापती व उपसभापती यांनी यावेळी दिली. राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार व राज्यसभा खासदार सौ. सुनेत्रा पवार यांचे मार्गदर्शनाखाली बारामती बाजार समितीचे कामकाज सुरू आहे. बारामती बाजार समितीचे विकासात दादांचे मोलाचे योगदान असल्याने समितीचा राज्यात नावलौकीक आहे असे मावळते सभापती सुनिल पवार यांनी सांगितले.
सदर निवडणूकीचे अध्यासी अधिकारी म्हणुन सहाय्यक निबंधक प्रमोद दुरगुडे यांनी कामकाज पाहिले. यावेळी बारामती तालुका राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष राजवर्धन शिंदे हे पक्ष निरीक्षक म्हणुन हजर होते. तसेच पीडीसीसी बँकेचे संचालक संभाजीनाना होळकर, दुध संघाचे चेअरमन पोपटराव गावडे, खरेदी विक्रीचे चेअरमन विक्रम भोसले तसेच बाजार समितीचे सदस्य युवराज देवकाते, सतिश जगताप, विनायक गावडे, बापुराव कोकरे, अरूण सकट, दयावान महाडीक, दतात्रय तावरे, शुभम ठोंबरे, विशाल भोंडवे, सौ. शोभा कदम, सौ. प्रतिभा परकाळे, मिलिंद सालपे, संतोष आटोळे, नितीन सरक तसेच व्यापारी व हमाल मापाडी उपस्थित होते. मान्यंवरांनी मनोगत व्यक्त केले व सदर निवडी नंतर समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी उपस्थितांनी सहकार्य केले बद्दल आभार मानले. राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षा तर्फे तसेच इतर मान्यवंरांनी नवनिर्वाचित सभापती व उपसभापतींचे अभिनंदन व सत्कार करण्यात आला व पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.