काळजाचं जळणं…
आपलं माणुस बघता बघता…
दुसर्याचा हात हातात घेऊन जातं…
ते पाहून काळजाचं जळणं काय असतं
ते कळतं…
आपल्या आवाजाने जिला तृप्ती मिळते
ती नवीन आवाजात चिंब भिजून जात असेल…
तेव्हा पावसात ही आग पेटते डोक्यात…
आगीची दाह काय असते.. तेव्हा च कळते..
आपल्या ला पाहून जी नेहमी स्माईल देते..
ती आता पाहून न पाहिल्या सारखं करते
तेव्हा देवाने डोळे च दिले नसते.. तर किती बरं झालं असतं..
असं काळजात वाटतं..
रोज सतत मेसेज करणारी ती..
आता चार चार दिवस
ढुंकूनही मोबाईल पहात नाही…
तेव्हा मोबाईल चा शोध लागला नसता तर बरं झालं असतं.. असं मनापासून वाटतं…
जिला आपलं काळीज मानलं..तीच निर्दय पणे काळीज चिरत जाते..
तेव्हा देवाने काळीज माणसाला दिलंच कशाला ….
असं राहून राहून वाटत
असं राहून राहून वाटत
नितीन कुमार शेंडे
बारामती