“कला, करिष्मा आणि कुंचल्याचं कमाल मिलाफ…!
बारामतीतील चित्रकारांच्या कलाकृतींचे प्रदर्शन — उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते उद्घाटन. झाले.
बारामती (प्रतिनिधी) — नटराज नाट्य कला मंडळ आणि बारामती कलाकार कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बारामतीमधील कलाशिक्षक चित्रकारांच्या चित्रकलाकृतींचे प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले .
या प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते आज रविवारी, दिनांक ६ एप्रिल २०२५ रोजी झाला. हा कार्यक्रम नटराज कला दालन, बारामती येथे पार पडला.
या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नगरसेवक तथा नटराजचे अध्यक्ष किरण दादा गुजर कार्यकर्ते , नटराज टीम कलाकार, नागरिक उपस्थित होते.

यावेळी वर्धमान विद्यालय वालचंदनगरचे अतुल सर ठरले चर्चेचे केंद्र वालचंदनगर –
कलाशिक्षक म्हणून श्री. अतुल गायकवाड सर यांनी आज एक असा पराक्रम केला, की सगळ्या परिसरात त्यांचं कौतुक होतंय, आणि तेही थेट राजकीय रंगमंचावर!

गोष्टीची सुरुवात झाली…
मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या भेटीने!
अतुल सरांनी आदरपूर्वक भेट घेतली, आणि काही क्षणांतच – आपल्या कुंचल्याने दादांचं स्केच अगदी समोरच तयार करून दाखवलं!

होय! फक्त काही मिनिटांतच!
दादांचे तेजस्वी डोळे, आत्मविश्वासपूर्ण चेहरा, आणि राजकारणातील अनुभवांचा ठसा – हे सगळं एका साध्या कागदावर त्यांनी इतक्या जिवंतपणे रेखाटलं, की दादांसकट उपस्थित सगळेच अचंबित झाले!
दादांचा चेहरा कॅनव्हासवर झळकला आणि कलाकाराचं कौतुक झरायला लागलं! या भेटीमुळे एक साधा कलाकार थेट राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीपर्यंत पोहोचला, आणि आपल्या कौशल्याने सर्वांना अभिमान वाटेल असं काम केलं!
अतुल सर म्हणजे केवळ शिक्षक नव्हेत, ते एक ‘प्रेरणा’ आहेत –तरुणांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि आजच्या काळातील कलाकारांसाठी!
“दादांचे स्केच” ही केवळ एक कलाकृती नव्हे – ती होती बारामतीच्या कलाशक्तीची ओळख! ‘वर्धमान विद्यालय’चे हे सुपुत्र शाळेतील विद्यार्थ्यांना केवळ चित्रकला शिकवत नाहीत, तर स्वप्नं, प्रेरणा आणि आत्मविश्वास देतात. आज बारामती, वालचंदनगर परिसरात एकच चर्चा –
“आपले अतुल सर… खरंच जबरदस्त….!”
कलाकारांचं कौतुक व्हायलाच हवं! कारण त्यांनीच आपलं भविष्य रंगीत करतं! दादांनी त्यांच्या कलेचे कौतुक
अभिनंदन केले
अतुल गायकवाड यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
कला आणि कर्तृत्वाची ही जोपासना अशीच फुलत रहा…
