एमआयडीसीचा विद्युत पुरवठा अधिक सक्षम करणार – धर्मराज पेठकर, मुख्य अभियंता महावितरण

0
6

एमआयडीसीचा विद्युत पुरवठा अधिक सक्षम करणार – धर्मराज पेठकर, मुख्य अभियंता महावितरण

बारामती एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना सद्यस्थितीत सुरळीतपणे विद्युत पुरवठा करण्यात येत आहे. परंतु बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनच्या वतीने करण्यात आलेल्या अनेक सूचना आणि प्रस्तावांचा विचार करून बारामती एमआयडीसीचा विद्युत पुरवठा अधिक कार्यक्षम करण्यात येईल अशी ग्वाही महावितरण बारामती परिमंडळाचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर यांनी दिली. बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशन (BIDA) च्या कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.

बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार, दिपक लहामगे अधीक्षक अभियंता,बारामती मंडळ, संजय सोनवलकर कार्यकारी अभियंता,बारामती विभाग, गणेश जमाले अतिरिक्त कार्यकारी अभियंता बारामती शहर उपविभाग ,गणेश जाधव उपकार्यकारी अभियंता बारामती ग्रामीण उपविभाग, महेश कानतोडे, सहाय्यक अभियंता शहर शाखा क्र2,बारामती शहर .महावितरणचे अधीक्षक अभियंता, असोसिएशनचे कार्यकारणी सदस्य महादेव गायकवाड, संभाजी माने, हरिश्चंद्र खाडे, विष्णू दाभाडे, रवी थोरात, उद्योजक गणेश लडकत, तुषार खाडे, गणेश जाधव यांनी या बैठकीस उपस्थित राहून चर्चेत सहभाग घेतला.

धनंजय जामदार म्हणाले महावितरणकडून समाधानकारक सेवा देण्यात येत आहे. परंतु यामध्ये अधिक सुधारणा करण्यास वाव आहे. वारंवार खंडित (ट्रीपिंग) होणारा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे, पॉवर फॅक्टर प्रणालीवर उद्योजकांना मार्गदर्शन करून आर्थिक नुकसान थांबवणे, एमआयडीसी हद्दीच्या बाहेरील उद्योगांना एमआईडीसी प्रमाणेच अखंड विद्युत पुरवठा करणे, शटडाऊन घेताना उद्योगांना अगोदर सुचित करणे, पणदरे एमआयडीसी मधील लघुउद्योगांचे विद्युत पुरवठा विषयी समस्या सोडवणे, एमआयडीसी फेज २ मध्ये येणाऱ्या नवीन प्रकल्पांची विजेची आवश्यकता विचारात घेऊन पायाभूत सुविधा निर्माण करणे, औद्योगिक ग्राहकांना वाढीव किंवा नवीन वीज पुरवठा तत्काळ मंजूर करणे, ट्रान्सफॉर्मर्स आणि डिस्ट्रीब्यूशन बॉक्स ची देखभाल दुरुस्ती आणि झाडेझुडुपे काढणे आदी मागण्या धनंजय जामदार यांनी यावेळी केल्या.

बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनने केलेल्या मागण्या रास्त असून त्यावर कार्यवाही करण्यात येईल अशी ग्वाही मुख्य अभियंता धर्मराज पेठकर यांनी दिली.

बारामती इंडस्ट्रियल डेवलपमेंट असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य संभाजी माने यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here