एक आउटलेट हवा आहे

0
71

एक आउटलेट हवा आहे

डॉ साहेब…
मेंदूला झिणझिण्या आल्या
आमच्या
इतकं काय घडलं?
की..मेंदूचा पार भुगा करुन टाकला तुम्ही
धाडधाड गोळ्या घालून…
सांगा न सर!
कुणाच्या घरात नसतात
कुरबुरी?
काळजातली उलथापालथ
ते वादळ..
शांत करायला
रामवाडी कुठं लांब होती?
जायचं होतं तिथंच सर
पेशंटची चटणी भाकर
खाल्ली असती..
पैशाची जमवाजमव करतांना
त्यांची चाललेली तारांबळ
पाहिली असती तर…
तुमचं दुःख तुम्हाला
खुजं वाटलं असतं!
डॉ साहेब…
ऐकू येतोय का तुम्हाला
एसपी मधला पेशंटचा
आक्रोश
ज्यांनी एक मेंदूविकार तज्ञ
गमावला..
सर!
देवमाणूस होता तुम्ही
डोळे झाकून मेंदूची
शस्त्रक्रिया करणारा एक
अवलिया होता तुम्ही !
ज्या तजेलदार मेंदूनं
इतरांना जीवदान दिलं
त्याच मेंदूचा तुम्ही चुराडा केला?
आतली खदखद मांडण्यासाठी
डॉ साहेब ..
प्रत्येकाच्या आयुष्यात
खरंच ..
एक आउटलेट हवा आहे !
एक आउटलेट हवा आहे!!
अलविदा सर!!

©️ अंजली राठोड श्रीवास्तव करमाळा.७७०९४६४६५३

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here