ऋतूश्रद्धा अपार्टमेंट येथे दत्त जयंती उत्साहात साजरी..!

0
3

ऋतूश्रद्धा अपार्टमेंट येथे दत्त जयंती उत्साहात साजरी..!

बारामती : एमआयडीसी परिसरातील रुई येथील दशरथ नगरमधील ऋतूश्रद्धा अपार्टमेंट येथे श्री दत्त जयंती मोठ्या भक्तीमय वातावरणात आणि उत्साहात साजरी करण्यात आली.

दत्त जयंतीनिमित्त महापूजा, पाळणा गीत, विविध भक्तिगीते, महाप्रसाद तसेच अन्नछत्राचे आयोजन करण्यात आले होते. या धार्मिक कार्यक्रमांना परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला.

या उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी अपार्टमेंटमधील सर्व नागरिकांनी एकत्रितपणे परिश्रम घेतले. मंदिर परिसराची आकर्षक सजावट करण्यात आली असून अन्नछत्राचे नियोजनही उत्तम प्रकारे पार पाडण्यात आले.

दत्त जयंतीनिमित्त राबविण्यात आलेल्या विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे उपस्थित भाविकांनी विशेष कौतुक केले. भक्ती, सेवा आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here