इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन च्या नॅशनल मीडिया सेक्रेटरी पदी संजय कुमार कोटेचा यांची निवड !

0
94

इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन च्या नॅशनल मीडिया सेक्रेटरी पदी संजय कुमार कोटेचा यांची निवड !


नवी दिल्ली – पत्रकारांच्या हितासाठी काम करणारी, त्यांच्या समस्यांचे निवारण करणारी , देशभरातील २२ राज्यांमध्ये व परदेशात एकूण ६५ हजार सभासद संख्या असलेल्या इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन इंटरनॅशनल नवी दिल्ली या पत्रकारांच्या संस्थेच्या नॅशनल मीडिया सेक्रेटरी पदी संजय कुमार कोटेचा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
गेल्या चार दशकापासून पत्रकारितेबरोबर ,सामाजिक, धार्मिक कार्यामध्ये सदा अग्रेसर असलेले संजयकुमार कोटेचा यांनी विविध संघटना, माध्यमाद्वारे जनहित साधण्याचे कार्य हाती घेतलेले असून,देशभरामधील वृत्तपत्रांच्या समस्या सोडविण्याचे, नवी दिल्ली येथील भारत सरकारच्या वृत्तपत्र नोंदणी कार्यालयातील नोंदणी प्रमाणपत्र मिळवून देण्याचे कार्य सातत्याने करीत आहेत, ‘इरा ‘ चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदाशिवाय महिला उन्नती संस्थेचे महाराष्ट्र समन्वयक व क्ल्यू इंटेलिजन्स डिटेक्टीव्ह डिपार्टमेंटचे महाराष्ट्र व कर्नाटक चे प्रभारी म्हणून कार्य करीत आहेत , त्यांच्या मदतीच्या हातामुळे लघु वृत्तपत्रापासून ते मोठमोठ्या दैनिकांचे रजिस्ट्रेशन संबंधित प्रश्न सुटण्यास सहकार्य लाभलेले आहे .सामाजिक कार्य करत असताना कित्येक गरजवंतांना तसेच महिलांना कोटेचा यांच्या सहकार्याने जीवनमान उंचावण्यास मदत झालेली आहे, कित्येकांचे अडचणीचे वेळी ते आधारवड ठरलेले आहेत. त्यांच्या आतापर्यंतच्या या कार्याची दखल घेऊन इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन इंटरनॅशनल चे राष्ट्रीय सरचिटणीस मोहम्मद जहांगीर यांनी ‘ इरा ‘ चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी कार्यरत असलेले संजय कुमार कोटेचा यांची इंडियन रिपोर्ट्स असोसिएशन इंटरनॅशनल नविदिल्ली चे नॅशनल मीडिया सेक्रेटरी पदी नियुक्ती केल्याचे पत्र बहाल केले आहे . संजय कुमार कोटेचा यांचे या निवडीबद्दल इंडियन रिपोर्ट्स असोसिएशन चे नवनिर्वाचित महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मदन (बापू)कोल्हे यांनी अभिनंदन केले असून ‘ इरा ‘ चे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव भारद्वाज व राष्ट्रीय महासचिव मों.जहांगीर यांचे,योग्य व्यक्तीची नॅशनल मीडिया सेक्रेटरी पदी नियुक्ती केल्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत.संजयकुमार कोटेचा यांच्या या निवडीबद्दल त्यांचेवर संपूर्ण देशभरा मधून अभिनंदनाचा वर्षाव होत असुन पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here