आविष्कार–२०२५ स्पर्धा बारामती कृषी महाविद्यालयात उत्साहाच्या वातावरणात संपन्न

0
27

आविष्कार–२०२५ स्पर्धा बारामती कृषी महाविद्यालयात उत्साहाच्या वातावरणात संपन्न

बारामती – महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि डॉ. शरदचंद्र पवार कृषी व संलग्न महाविद्यालय, शारदानगर – बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर–महाविद्यालयीन आविष्कार–२०२५ संशोधन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी उत्साहात पार पडला. हा समारंभ एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती यांच्या शैक्षणिक प्रांगणातील मंथन सभागृहात पार पडला.
या स्पर्धेस ३७ महाविद्यालयांचा सहभाग असून, एकूण २२७ विद्यार्थी संशोधक (१२३ मुले, १०४ मुली) यांनी विविध संशोधन गटांमध्ये प्रकल्प सादर केले.
स्पर्धेतील ६ प्रमुख श्रेणी
मानवविद्या, भाषा व ललित कला
वाणिज्य, व्यवस्थापन व विधी
शुद्ध विज्ञान
कृषी व पशुपालन
अभियांत्रिकी व तंत्रज्ञान
फार्मसी व वैद्यक

या सर्व गटांमध्ये विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण संशोधन सादर करून परीक्षकांची प्रशंसा मिळवली.

सहा कॅटेगरीतील खालील संशोधन प्रकल्प राज्यस्तरीय आविष्कार स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ते पुढीलप्रमाणे –

डॉ. शरदचंद्र पवार कृषी व संलग्न महाविद्यालय, बारामती – ११ संशोधन प्रकल्प

कृषी महाविद्यालय, पुणे – ८ संशोधन प्रकल्प

कृषी महाविद्यालय, कोल्हापूर – ७ संशोधन प्रकल्प

कृषी महाविद्यालय, धुळे – ४ संशोधन प्रकल्प

पोस्ट ग्रॅज्युएट महाविद्यालय, राहुरी – ४ संशोधन प्रकल्प

बारामती महाविद्यालयाचे सर्वाधिक संशोधन प्रकल्पांनी उत्कृष्ट कामगिरी करत अव्वल स्थान पटकावले.

बक्षीस वितरण कार्यक्रमा मध्ये प्रमुख पाहुणे मा. डॉ. अतुल ए. अत्रे, राज्यपाल नियुक्त माजी संचालक व निरीक्षक, अहमदनगर, महाराष्ट्र राज्य आंतर-विद्यापीठीय आविष्कार स्पर्धा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांची संशोधनाची आवड वृद्धिंगत होऊन,
नवीन कल्पना, तंत्रज्ञानातील नवोन्मेष आणि वैज्ञानिक दृष्टिकोन अधिक बळकट होत असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डॉ. शंकरराव एस. मगर, माजी कुलगुरू, डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ, दापोली व विश्वस्त, एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती होते.
विद्यार्थ्यांनी संशोधन वृत्ती बाळगून कृषी क्षेत्राच्या विकासामध्ये योगदान द्यावे असे आवाहन केले.

हा उपक्रम एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती चे चेअरमन मा. राजेंद्रदादा पवार व विश्वस्त मा. सौ. सुनंदा पवार यांच्या प्रेरणेतून राबविण्यात आला.
स्पर्धेचे प्रमुख आयोजक प्रा. निलेश नलावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा शिक्षण संचालक यांनी संपूर्ण स्पर्धेला दिशा दिली.
कार्यक्रमाच्या नियोजनात उपप्राचार्य प्रा. संदीप पी. गायकवाड, यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
कार्यक्रमाचे प्रभावी संचालन व समन्वय प्रा. आर. एम. बेलदार, प्रा. पी. जी. पाटील, डॉ. पी. ए. पाटील व प्रा. पी. जी. शिंदे यांनी केले.
सर्व प्राध्यापक रुंद शिक्षकेतर कर्मचारी आणि शिपाई वर्ग यांनी मोलाचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here