आळंदी नगरपालिकेचे नवनिर्वाचित मुख्याधिकारी माधव खांडेकर यांचा सन्मान..!

0
94

आळंदी नगरपालिकेचे नवनिर्वाचित मुख्याधिकारी माधव खांडेकर यांचा सन्मान..

प्रतिनिधी: आळंदी: आळंदी नगरपालिकेचे नवनिर्वाचित मुख्याधिकारी श्री. माधव खांडेकर यांचा नगरपरिषदेत सन्मान करण्यात आला. यापूर्वी त्यांनी नातेपुते नगरपंचायतीमध्ये प्रभावी कामगिरी बजावली होतमुख्याधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर शहरातील विविध राजकीय व सामाजिक नेत्यांनी त्यांचे स्वागत केले आणि भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मा. नगरसेवक ज्ञानेश्वर रायकर, शिवसेना शहरप्रमुख राहुल चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते माऊली घुंदरे, रवी कदम, विनायक महामुनी, संकेत वाघमारे तसेच महिलाघाडीच्या नेत्या थोरवे ताई उपस्थित होत्या.

या कार्यक्रमात शहराच्या विकासासाठी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली. नव्या मुख्याधिकाऱ्यांनी आळंदीतील पायाभूत सुविधा, स्वच्छता मोहिमा आणि धार्मिक पर्यटनाच्या विकासासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केले. उपस्थित नागरिकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांना शुभेच्छा देत आळंदी शहराच्या विकासासाठी त्यांचे सहकार्य राहील, असे आश्वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here