आज सकाळची लोकल दौंडपर्यंतच; संध्याकाळची पुणे-बारामती लोकल अचानक रद्द

0
4

बारामती-पुणे डेमो लोकलचा सावळा गोंधळ; प्रवाशांचे हाल, रेल्वे प्रशासन गप्प!

सकाळची लोकल दौंडपर्यंतच; संध्याकाळची पुणे-बारामती लोकल अचानक रद्द — तिकिटांचे पैसे गेले कुठे? प्रवाशांचा संतप्त सवाल…!

बारामती : संतोष शिंदे (संपादक)९८२२७३०१०८

बारामती आज दिनांक ३ ऑकटोंबर २०२६ झाले असे की -पुणे-बारामती रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आज रेल्वे प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराचा मोठा फटका बसला. सकाळच्या सुमारास बारामतीहून पुण्याकडे जाणारी डेमो लोकल दौंडपर्यंतच धावली, तर पुण्याहून संध्याकाळी बारामतीकडे येणारी डेमो लोकल धावलीच नाही. त्यामुळे पुणे-बारामती दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.
नियमित रेल्वेसेवेवर अवलंबून असलेल्या प्रवाशांनी नियोजित वेळेनुसार प्रवासासाठी तिकिटे काढली होती. मात्र, अचानक रेल्वेसेवा उपलब्ध न झाल्याने तिकिटांचे पैसे वाया गेले का?, असा संतप्त सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
सकाळची बारामती-पुणे लोकल दौंडपर्यंतच धावविण्यात आली, तर पुण्याहून बारामतीकडे परतीचा प्रवास करणारी संध्याकाळची डेमो लोकल रद्द करण्यात आल्याची माहिती प्रवाशांना मिळाली. मात्र, ही सेवा नेमकी कोणत्या कारणामुळे रद्द करण्यात आली, याबाबत रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आली नाही.
रेल्वेच्या वेळापत्रकावर विश्वास ठेवून प्रवास करणाऱ्या सामान्य प्रवाशांना अचानक अशा प्रकारे वाऱ्यावर सोडणे कितपत योग्य, असा सवाल उपस्थित होत आहे. रेल्वेसेवा रद्द करायची असल्यास त्याची पूर्वसूचना प्रवाशांना का देण्यात आली नाही? सेवा रद्द होण्याचे कारण काय? तिकिटांचे पैसे प्रवाशांना परत मिळणार का? या प्रश्नांची उत्तरे रेल्वे प्रशासनाने द्यावीत, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
बारामती-पुणे-बारामती डेमो लोकलच्या बाबतीत वारंवार असा सावळा गोंधळ सुरू राहिला, तर रोजच्या प्रवासासाठी रेल्वेवर अवलंबून असलेल्या प्रवाशांचे हाल कोण भरून काढणार? असा सवालही स्थानिक रेल्वे प्रवाशांनी उपस्थित केला आहे.
रेल्वे प्रशासनाने बारामती-पुणे डेमो लोकलचे वेळापत्रक, सेवा रद्द करण्यामागील कारणे आणि प्रवाशांच्या तिकिटांच्या पैशांबाबत तातडीने स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
यासंदर्भात स्थानिक रेल्वे प्रवाशांनी ‘भावनगरी’शी बोलताना रेल्वे प्रशासनाच्या या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

Previous articleमहाराष्ट्रात पावसाची मोठी तूट; पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात चिंतेचे सावट..!
Bhavnagari
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here