अनेकान्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये रक्तदान शिबीर संपन्न
बारामती येथील अनेकान्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजच्या रोट्रॅक्ट क्लब व स्वर्गीय माणिकबाई चंदुलाल सराफ, रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सदर शिबीर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी एम्स रोट्रॅक्ट क्लबचे अध्यक्ष निर्मल रायसोनी, उपाध्यक्षा प्रणाली पवार, सचिव नेत्रा कुलकर्णी, खजिनदार विशाल माने व क्लबच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.
रक्तदान शिबिरानंतर रोट्रॅक्ट क्लबच्या वार्षिक कार्यक्रमाची रूपरेषा सांगण्यासाठी डिस्ट्रीक्ट रोट्रॅक्ट क्लब ३१३१ झोन ८ चे डिस्ट्रीक्ट क्लब सल्लागार, यशवर्धन कांचन, डिस्ट्रीक्ट झोनल प्रतिनिधी विक्रांत काकडे यांनी मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी रोट्रॅक्ट क्लब ऑफ डेलोनिक्स फार्मसी कॉलेज बऱ्हाणपूर, रोट्रॅक्ट क्लब ऑफ बारामती यांनी सहभाग घेतला.
सदर रक्तदान शिबिराला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जवाहर शाह वाघोलीकर, मिलिंद शाह वाघोलीकर, तसेच एम्सचे सचिव डॉ.हर्षवर्धन व्होरा व नियामक मंडळ सदस्य डॉ.प्रीतम व्होरा, संचालक डॉ.एम.ए.लाहोरी यांनी अभिनंदन केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा.डॉ.संध्या खटावकर व त्यांच्या सह्का-यांनी परिश्रम घेतेले.