अडीचशे वर्षांपूर्वी आणि आज बारभाईंचे कारस्थान

0
337

अडीचशे वर्षांपूर्वी आणि आज
बारभाईंचे कारस्थान
काय योगायोग आहे पहाच
बारभाई मंडळ प्रमुख होता फ़डणविस ( नानासाहेब फडणविस) आणि सोबत होता शिंदे ( महादजी शिंदे ) तेव्हा तह झाला सुरतचा .. आणि आताही सुरतच
असे म्हणतात की काळ कितीही बदलो, माणसे आणि त्यांच्या वागण्याच्या पद्धती बदलत नाहीत.

आज जशी राजकीय उलथापालथ महाराष्ट्रात सुरू आहे…तशीच उलथापालथ सुमारे अडीचशे वर्षांपूर्वी (ई.स.१७७४ ते ई.स.१७७९) या काळात झाली होती.
स्रीहट्ट व पुत्रमोहाने आंधळ्या झालेल्या राघोबादादा पेशव्यांनी अन्याय व कपटाने आपल्या पुतण्याची हत्या घडवून पेशवाईची गादी मिळवली. सत्ता मिळताच मोठ्या प्रमाणात दडपशाही सुरू केली… लोकांना, सरदारांना राघोबाचे पेशवे होणे आवडले नव्हते… प्रमुख कारभाऱ्यांना नजरकैदेत टाकले किंवा पदच्युत केले गेले….मुख्य न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणेंना बरखास्त केले गेले.

मातब्बर सरदार जसे शिंदे, होळकर, भोसले, गायकवाड, पेठे, पटवर्धन यांच्याशी असलेला सम्पर्क तोडला गेला. स्वामिनिष्ठ मराठी फौजेला बाजूला करून भाडोत्री, उपऱ्या गारद्यांची फौज राघोबाने उभी केली.
अश्या वेळी नजरकैदेत आणि पहाऱ्यात असणाऱ्या नाना फडणवीस आणि सखारामबापू बोकील यांनी मराठेशाहीतील इतर १० सरदारांना (एकूण १२) गुप्तपणे संधान बांधून एक योजना आखली… निजामाच्या दरबारातील मराठेशाहीचे वकील यांच्याकडून पुण्याला बातम्या पेरण्यात आल्या की, “निजाम युद्धाची तयारी करतोय आणि लवकरच स्वराज्यावर हल्ला करणार आहे.”
निजामाचा समाचार घ्यायला जसा राघोबादादा पुण्याबाहेर गेले तसे कारभारी व सरदारांनी पुणे ताब्यात घेऊन राघोबाच्या निकटवर्तीयांना बंदी बनवले… आणि न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणेंच्या निकालाने राघोबाला पदच्युत केले….
दिवन्गत नारायणराव पेशव्यांच्या पत्नीस – गंगाबाईस दिवस गेले होते…तिला पुरंदर किल्ल्यावर हलवले… तिच्या पोटी जो पुत्र झाला, त्याचे नाव सवाई माधवराव ठेवून त्याच्या नावे द्वाही फिरवून नाना फडणवीस यांनी कारभार सुरू केला.


राघोबाला या कटाची माहिती मिळताच तो मोहीम टाकून पुन्हा पुण्याकडे निघाला… पण वाटेतच त्याला अडवायला बारभाईंची फौज त्रिम्बकमामा पेठेंच्या नेतृत्वात उभी ठाकली. कासेगावच्या लढाईत पेठेंना वीरमरण आले….पण राघोबा सुरतेला इंग्रजांकडे पळून गेला… त्याला आश्रय देणाऱ्या इंग्रजांवर महादजी शिंदे चालून गेले आणि इंग्रजांचा पराभव करून राघोबाला ताब्यात घेतले.
पुढे राघोबाला आयुष्यभर कोपरगावला दरमहा ३ लाख रु. तनखा देऊन नजरकैदेत (गावची हद्द न सोडणे) रहावे लागले आणि ५ वर्षांतच तो मरण पावला.


लहानग्या सवाई माधवरावाला मांडीवर बसवून नाना फडणवीस व महादजी शिंदे यांनी पुढील २५ वर्षे मराठी राज्य सांभाळले.
आज पुन्हा तीच नावे , फडणवीस आणि शिंदे, म्होरके फुटीर १२ आमदार… आणि परत सुरतच

काय हा योगायोग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here