पंढरपूर येथे 22 जून 2025 रोजी अखिल महाराष्ट्र पंढरपूर सायकलवारीचे चौथे संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. बारामती सायकल क्लब, नाशिक सायकलीस्ट फाउंडेशन, पंढरपूर सायकलर्स क्लब आणि लातूर सायकलिस्ट फाउंडेशन यांच्या एकत्रित प्रयत्नांनी आयोजित या भव्य सोहळ्यात संपूर्ण महाराष्ट्रातून 4000 हून अधिक सायकलीस्ट्स सहभागी झाले होते.

या सोहळ्याचा शुभारंभ 21 जून 2025 रोजी पहाटे बारामती सायकल क्लबच्या 192 सायकलीस्ट्सच्या तीन हत्ती चौकातून पंढरपूरकडे प्रस्थानाने झाला. दुपारी 12:30 वाजता त्यांचे पंढरपूर नगरसेवक श्री. सनी मुजावर यांनी फेटे, हार, पुष्पगुच्छ आणि थंड पेय देऊन मनपूर्वक स्वागत केले. त्यानंतर सायकलीस्ट्स दोन भक्तनिवासामध्ये मुक्कामी होते, जिथे महाराष्ट्राच्या विविध 95 ठिकाणांहून आलेले सायकल क्लब्स आणि संस्थांचे सायकलीस्ट्स एकत्र आले होते.

रविवार, 22 जून 2025 रोजी सकाळी 6 वाजता केंद्रीय युवा व क्रीडा मंत्री श्रीमती रक्षा खडसे, सोलापूर जिल्हा पालकमंत्री श्री. जीवनकुमार गोरे, श्री. धैर्यशील मोहिते-पाटील, श्री. रणजितसिंह मोहिते-पाटील, श्री. प्रशांत परिचारक, श्री. पांडुरंग चाटे, मुख्याधिकारी श्री. महेश रोकडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पंढरपूर नगरप्रदक्षिणा सायकल फेरीस सुरुवात झाली. दोन-तीनच्या ओळीतून शिस्तबद्धपणे निघालेल्या सायकलीस्ट्सच्या सहभागाने “विठू माउलीच्या गजरात अवघी पंढरी दुमदुमली”. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत पाच किलोमीटरची सायकल प्रदक्षिणा पूर्ण करून सर्व सायकलीस्ट्स रेल्वे ग्राउंड येथे एकत्र आले. त्याठिकाणी “हरी विठ्ठल” चा एक तासाचा जयघोष करून केंद्रीय मंत्र्यांना निवेदन देण्यात आले व त्यांनी सर्वांना मार्गदर्शन केले.
यानंतर विठ्ठल-रुक्मिणी भक्तनिवास आरती मंडपात चौथे संमेलन मोठ्या दिमाखात पार पडले. सहकार मंत्री श्री. बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि श्री. उमेश परिचारक, श्री. राजेंद्र वानखेडे, अॅड. श्रीनिवास वायकर, श्री. श्रावण उगले, श्री. नाईक, श्री. दुसाने आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. प्रसिद्ध अतिथी म्हणून डॉ. अमित समर्थ (अॅथलीट) उपस्थित होते.
श्री. उमेश परिचारक यांनी प्रास्ताविक केले, राजेंद्र वानखेडे यांनी शुभेच्छा दिल्या, बाबासाहेब पाटील यांनी मार्गदर्शन केले, तर श्री. श्रावण उगले यांनी शब्दफुलांनी स्वागत व आभार मानले. प्रत्येक क्लबच्या अध्यक्षांचा सत्कार करून सायकलिंग व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सायकलीस्ट्सना विशेष ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ. अमित समर्थ यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “इच्छाशक्ती प्रबळ असेल व साथ देणारे चांगले मित्र असतील तर आपण निश्चितच यशाचे शिखर गाठू शकतो. सायकलींगचा लळा जीवनातील अनेक महत्त्वाचे धडे शिकवतो.”

पुढील वर्षीचे अखिल महाराष्ट्र सायकल संमेलन साधारणतः 12 जुलै 2026 रोजी होणार असल्याचे आयोजकांनी जाहीर केले. दरम्यान, नाशिक सायकलीस्ट फाउंडेशनच्या सदस्यांनी “अंमली पदार्थाची नशा, आयुष्याची दुर्दशा” या विषयावर प्रभावी पथनाट्य सादर करून व्यसनमुक्तीचा संदेश दिला. उपाध्यक्ष डॉ. मनीषा रौंदळ व सहकाऱ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण करून प्रेक्षकांची मने जिंकली. ज्ञानेश्वर जगताप व रेखा चंद्रराव यांनी कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन केले.
बारामती सायकल क्लब, पंढरपूर सायकलर्स क्लब, नाशिक सायकलीस्ट फाउंडेशन आणि लातूर सायकलिस्ट फाउंडेशन यांनी संमेलनाच्या यशासाठी मोलाचे योगदान दिले. सर्व सायकलीस्ट्सना लातूर सायकलिस्ट क्लबच्या वतीने रुचकर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचा सर्वांनी आनंद लुटला. संमेलनाच्या निमित्ताने विविध क्लब्सना एकमेकांशी संवाद साधण्याची, अनुभव शेअर करण्याची आणि भावी उपक्रमांची चर्चा करण्याची संधी मिळाली.
बारामती सायकल क्लबने यंदा 192 सदस्यांसह सहभाग घेतला असून पुढील वर्षी आणखी मोठ्या संख्येने सहभागी होऊन पर्यावरण संवर्धन व सायकलिंग उपक्रम अधिक मोठ्या प्रमाणात राबवण्याचा संकल्प केला