:जयपाल पाटील:
मूल जन्माला आल्यानंतर अल्पावधीतच ते कुटुंब आणि समाजाचाच एक भाग बनते. सामाजिकीकरणाच्या निरंतर चाललेल्या प्रक्रियेमुळे व्यक्तीचे प्रश्न आणि समाजाच्या समस्या यांचा परस्परांची दृढसंबंध निर्माण होतो. स्वातंत्र्योत्तर काळातील गेल्या ७५ वर्षांतील आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमुळे भारतातील जनतेचे सरासरी आयुर्मान लक्षणीयरीत्या वाढले आहे. मात्र व्यक्तीला कुटुंब आणि समाज जीवनात वावरताना अनेक धोके निर्माण होतात. त्यापासून संरक्षण मिळविण्याची गरज असते. मानवी जीवन मौल्यवान असल्याने त्याची प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज असते. संकटाच्या काळात स्वतःची सुरक्षितता सांभाळून इतर संकटग्रस्तांना मदत करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. अलिबागचे ज्येष्ठ पत्रकार जयपाल पाटील गेली अनेक वर्षे आपत्ती आणि सुरक्षाविषयक तज्ज्ञ म्हणून रायगड जिल्ह्यात, महाराष्ट्रात आणि देश पातळीवर कार्यरत आहेत.त्यांनी सिव्हिल डिफेन्स उरण रायगड,होमगार्ड कॉलेज मुंबई, यशदा पुणे आणि भारतीय सैन्य शीख रेजिमेंट रांची, झारखंड येथे प्रशिक्षण घेतले.
![](https://bhavnagari.in/wp-content/uploads/2022/12/WhatsApp-Image-2022-12-20-at-10.12.46-1024x512.jpeg)
उच्चशिक्षित जयपाल पाटील हे सन२०१४ पासुन शाळा, महाविद्यालये,विविध शासकीय कार्यालये ग्रामपंचायती आणि रुग्णालये इ. ठिकाणी आपल्या व्याख्यानांद्वारे आणि प्रात्यक्षिकांद्वारे समाज प्रबोधनाचे कार्य उत्तमप्रकारे करीत आहेत. मुंबईला झालेल्या चौथ्या जागतिक आपत्ती परिषदेत त्यांनी चौथ्या आय.आय.टी. मुंबई येथे झालेल्या जागतिक आपत्ती परिषदेत दोन चाकी वाहनांच्या अपघाता संबंधी शोध निबंध सादर केला होता. तर पाचव्या जागतिक आपत्ती परिषद आय.आय.टी. दिल्ली येथे कोविड नंतर काय?हा शोधनिबंध सादर केला होता. त्यांना आपले विचार सविस्तरपणे सादर करण्याची संधीही प्राप्त झाली. त्याचे जगामध्ये कौतुक झाले. त्यांचे *आपत्ती व सुरक्षा हे पुस्तक व्यक्ती, संस्था, शाळा महाविद्यालये यांना अतिशय उपयुक्त मार्गदर्शन करणारे असे आहे. घरातील गॅस सिलेंडर आणि त्याची जोडणी, वीज पुरवठा यांच्याबाबत योग्य काळजी घेतल्यास मानवी जीवनाचे, मालमत्तेचे संरक्षण होते. विविध प्रसंगी होणारे अपघात, नैसर्गिक आपत्तींच्यावेळी कोणती काळजी घ्यावी आणि कोणती उपाययोजना करावी याची माहिती प्रत्येक नागरिकाच्या हिताच्या दृष्टीने अत्यावश्यक असते. गेली अनेक वर्षे हे महत्त्वपूर्ण कार्य जयपाल पाटील हे तन,मन आणि धन खर्चून समाजहितासाठी करीत आहेत.
![](https://bhavnagari.in/wp-content/uploads/2022/12/WhatsApp-Image-2022-12-20-at-10.11.54-2.jpeg)
जनतेला आपत्ती व्यवस्थापनाचे प्रभोधन आकाशवाणी मुंबई, सोलापूर, रत्नागिरी, कोल्हापूर, येथुन व प्रत्यक्ष 450 हून अधिक व्याख्याने द्वारे लाखो लोकांना जीवन अनमोल आहे, त्याची काळजी घ्या. माझे कुटुंब माझी जबाबदारी कार्यक्रमामुळे त्यांच्या या कार्याची स्थनिक,राज्य आणि देश पातळीवर नोंद घेतली. महाराष्ट्रातील एकमेव पत्रकार म्हणून रायगड जिल्हा परिषदेने “रायगड भूषण” पुरस्कार देऊन सन्मानित केले. अखिल भारतीय आगरी समाज संघटनेने “राष्ट्रीय सन्मान” पुरस्कार दिला तर प्रजापिता ब्रह्मकुमारी राजयोग केंद्र माउंट अबू तर्फे “राष्ट्रीय सन्मान” आणि सिनीयर वर्ल्ड तर्फे “सीनियर वर्ल्ड शैक्षणिक अवार्ड 2022” देण्यात आला आहे. सध्या ते 804 रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायतीतील ग्रामस्थांना, तसेच महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी कल्याण आश्रमाच्या शाळांमध्ये,शिक्षक कर्मचारी विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देत आहेत.त्यांच्या आपत्ती व्यवस्थापन व्याख्यानाचा ५००वा प्रयोग ४४८ अदिवासी मुली समोर करण्याचे त्यांनी निश्चित केले आहे.त्यांच्या कार्याला हार्दिक शुभेच्छा देतानाच त्यांचे हार्दिक अभिनंदनही करावेसे वाटते आहे.
- प्रा.शाम जोगळेकर.
९२७३३४३१७७