KACF इंग्लिश मिडीयम स्कुल मधील कु. सई फत्तेसिंग देशमुख हिची 17 वर्ष वयोगटामध्ये महाराष्ट्राच्या मुलींच्या डॉजबॉल संघामध्ये निवड

0
130

KACF इंग्लिश मिडीयम स्कुल मधील कु. सई फत्तेसिंग देशमुख हिची 17 वर्ष वयोगटामध्ये महाराष्ट्राच्या मुलींच्या डॉजबॉल संघामध्ये निवड

     क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे यांच्या अंतर्गत व लातूर जिल्हाक्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमानाने शालेय राज्यस्तरीय डॉजबॉल स्पर्धा उदगीर जिल्हा लातूर येथे दिनांक 10  व 11 डिसेंबर 2023 रोजी पार पडल्या. याठिकाणी निवड चाचणी समितीने KACF इंग्लिश मिडीयम स्कुल बारामती मधील कु. सई फत्तेसिंग देशमुख हिच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर तिची 17 वर्ष वयोगटमध्ये महाराष्ट्र राज्याच्या मुलीं च्या डॉजबॉल संघामध्ये निवड करण्यात आली. या स्पर्धमध्ये KACF इंग्लिश मिडीयम स्कुल, बारामती मधील कु. अनुजा धुमाळ, कु. सई देशमुख, कु. स्वरा जगदाळे, कु. मेहरुनिसा शेख, कु. तनुश्री झगडे, कु. अनन्या दुधे, कु. सृष्टी वेले, कु. अनुष्का डोंबाळे, कु. शरयू माने, कु. आर्या लोणकर या खेळाडूंनी पुणे विभागाचे प्रतिनिधित्व केले. त्यांना श्री. पवन धनकर, श्री. महेंद्र मोटघरे, श्री. सुरज वाघमारे व सौ. सुनिता कांबळे मॅडम यांचे मोलाचे प्रशिक्षण लाभले. 
    KACF इंग्लिश मिडीयम स्कुलच्या खेळाडूंना श्री. प्रशांत (नाना) सातव, सौ. सुनिता शेडगे, (प्रिन्सीपल, KACF इंग्लिश मिडीयम स्कुल) व सर्व विश्वस्त यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य नेहमीच लाभत असल्यामुळे त्यांनी वरील विविध स्पर्धेमध्ये दैदिप्यमान यश संपादन केले. त्यांनी मिळविलेल्या भरघोस यशामुळे बारामती पंचक्रोशी व कारभारी आण्णा चॅरिटेबल फाऊंडेशनचे अध्यक्ष व विश्वस्तांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
    वरील बातमी आपल्या सुप्रसिध्द वर्तमानपत्रामध्ये प्रसिध्द करण्यात यावी ही नम्र विनंती. 
                                आपला नम्र,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here