Empower ’25 – Be Your Best Self : व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा यशस्वी
बारामती (ता. १४ ऑगस्ट) :
विद्या प्रतिष्ठान्स इंग्लिश मीडियम स्कूल, बारामती येथे इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी “Empower ’25 – Unfolding the Best You” ही एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात पार पडली. शाळेच्या सभागृहात सकाळी ९.३० ते दुपारी २.३० या वेळेत ही कार्यशाळा घेण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात ध्यान व अॅफर्मेशन्सने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी आइस-ब्रेकर सत्र घेण्यात आले.
सत्रामध्ये श्री. लोकेश भट यांनी संवादकौशल्ये व सॉफ्ट स्किल्स या विषयावर मार्गदर्शन केले, तर श्री. संभाजी कांगुने यांनी किशोरवयीन व्यक्तिमत्व विकास – आव्हाने व उपाययोजना या विषयावर विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.
यानंतर झालेल्या पोस्टर मेकिंग गटक्रियाकलापामुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, टीमवर्क आणि अभिव्यक्तीची उभारी दिसून आली.
कार्यक्रमाच्या अखेरीस विद्यार्थ्यांनी आपले अनुभव व अभिप्राय व्यक्त केले. या सत्रांमुळे आत्मजागरूकता, आत्मविश्वास आणि जीवनकौशल्यांचा विकास झाल्याचे त्यांनी सांगितले.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. राधा कोरे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाचे महत्त्व अधोरेखित करत मार्गदर्शन केले.
एकूणच ही कार्यशाळा संवादात्मक, प्रेरणादायी व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरली.