AIMS बारामतीत Intaglio Series 2025 चे आयोजन

0
20

AIMS बारामतीत Intaglio Series 2025 चे आयोजन

बारामतीतील विद्यार्थ्यांच्या व्यवस्थापन शिक्षणासाठी प्रतिष्ठित मानली जाणारी अनेकांत इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (AIMS) या संस्थेत Intaglio Series 2025 या आंतरमहाविद्यालयीन व्यवस्थापन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा भव्य कार्यक्रम १४ व १५ फेब्रुवारी २०२५ रोजी संस्थेच्या परिसरात पार पडणार आहे.

AIMS ही संस्था सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न आणि NAAC मानांकित असून बारामती परिसरातील व्यवस्थापन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे पहिले पसंतीचे ठिकाण मानली जाते.

या महोत्सवाचा उद्देश विद्यार्थ्यांमधील वक्तृत्व, व्यक्तिमत्त्व विकास, सभाधीटपणा व संवाद कौशल्ये वृद्धिंगत करणे हा आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. भरत शिंदे (प्राचार्य, व्ही. पी. आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज), शोडेन गोपेर्मा (ट्रेनींग अँड प्लेसमेंट ऑफिसर, PIBM पुणे) आणि माजी विद्यार्थी विराज उदय पोतदार (ब्रँच ऑपरेशन्स मॅनेजर, आरबीएल बँक पुणे) यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

कार्यक्रमासाठी अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. जवाहर शहा (वाघोलीकर), सचिव श्री. मिलिंद शहा (वाघोलीकर), डॉ. हर्षवर्धन व्होरा आणि गव्हर्निंग कौन्सिल सदस्य महावीर संघवी व आदित्य शहा (पंदारकर) यांची प्रमुख उपस्थिती असेल.

संस्थेचे संचालक डॉ. एम. ए. लाहोरी व कार्यक्रम समन्वयक प्रा. सचिन जाधव यांनी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी व स्पर्धात्मक मनोवृत्ती वाढवण्यासाठी Intaglio Series 2025 ही एक मोठी संधी ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here